तुपासोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात तुपाचे सेवन केले जाते. तूप खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात एक चमचा तूप खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शिवाय रिकाम्या पोटी तूप खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. अभिनेत्रींनपासून ते सर्व सामान्यांपर्यंत सर्वच जेवणात तुपाचा वापर करतात. तूप खाल्यामुळे आरोग्यासह त्वचा, केसांना अनेक फायदे होतात. तुपाचे सेवन केल्यामुळे निस्तेज आणि कोरडी झालेली त्वचा सुधारण्यास मदत होते. तुपाचा वापर धार्मिक गोष्टींसाठी सुद्धा केला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तूप उपलब्ध आहे. तुपामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. शिवाय यामध्ये ए, डी, ई आणि के सारख्या चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे सुद्धा आढळून येतात. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुपाचे सेवन केले जाते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेची कमी झालेली चमक पुन्हा वाढवण्यासाठी अनेक महिला तुपाचे सेवन करण्यासोबतच तूप त्वचेला सुद्धा लावतात.यामुळे त्वचेमधील ओलावा आणि नैसर्गिक तेल टिकून राहते. सर्दी, खोकला, त्वचारोग किंवा इतर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी दैनंदिन आहारात तुपाचे सेवन करावे. पण आज आम्ही तुम्हाला तूप खाल्यानंतर लगेच कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. तुपासोबत कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडून आरोग्याचे नुकसान होऊ शकते
अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात तूप लावलेली चपाती चहासोबत खातात किंवा चहामध्ये तूप टाकून पितात. पण असे करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकते. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. दोन्ही पदार्थ एकत्र पोटात गेल्यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवू लागतात.
आयुर्वेदामध्ये तूप आणि मध एकत्र खाण्यास मनाई करण्यात आली आहे. तूप आणि मध एकत्र खाल्यामुळे पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तूप आणि मध एकत्र खाऊ नये. तूप आणि मध हे दोन्ही पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. शिवाय या पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटात रासायनिक प्रतिक्रिया होऊ लागतात.
आंबट फळांचे सेवन केल्यांनतर तूप खाऊ नये. त्यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादी फळांचे सेवन केल्यानंतर चुकूनही तूप खाऊ नये. या फळांच्या सेवनानंतर दोन तासांनी तुपाचे सेवन करू शकता. चुकीच्या पद्धतीने तुपाचे सेवन केल्यास गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवते. फळे खाल्यानंतर पचनक्रिया सहज होते, मात्र तूप पचन होण्यास जास्त वेळ लागतो.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दही आणि तूप हे दोन पदार्थ एकत्र खाण्यास मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पचनाची समस्या उद्भवू पोटात दुखणे, गॅस होणे, जेवण पचन न होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.तूप आणि दही हे दोन्ही पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत.