पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात मिक्स करा तुरटी
तुरटीचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. त्वचा आणि केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. अनेकदा पायांमध्ये चप्पल किंवा बूट घातल्यानंतर पायांना खूप दुर्गंधी येऊ लागते. यामुळे पाय काळे आणि निस्तेज होऊन जातात. पण पायांचे त्वचेकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे पायांची त्वचा आधीच टॅन आणि खराब होऊन जाते. शिवाय पायांना दुर्गंधीचा वास येऊ लागतो. अशावेळी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. पायांच्या दुर्गंधीपासून आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात तुरटी टाकून त्यात पाय ठेवावे. तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. तर अनेक लोक अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ करतात. यामुळे त्वचेवरील जखमा, डाग निघून जातात. आज आम्ही तुम्हाला गरम पाण्यात तुरटी मिक्स करून त्यात पाय बुडवून ठेवल्यामुळे पायांना नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पायांची दुर्गंधी वाढल्यानंतर अनेकदा लाजिरवण्यासारखे वाटू लागते. चारचौघांमध्ये गेल्यानंतर आत्मविश्वास कमी होऊन जातो. पायांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात तुरटी फिरवून त्यात पाय घालून बसावे. यामुळे पायांचा वास निघून जातो आणि पाय स्वच्छ होतात. पायांमध्ये येणारी घामामुळे आणि बॅक्टेरियामुळे सतत दुर्गंधी येऊ लागते. अशावेळी तुरटीच्या पाण्याने पाय स्वच्छ करावे.
दिवसभरात काम करून थकलेल्या शरीराला आराम देण्यसाठीच अनेक लोक घरी आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करतात. याचं गरम पाण्यात तुम्ही तुरटी फिरवून अंघोळ केल्यास शरीराचा थकवा दूर होईल. शिवाय यामुळे चांगली झोपही लागेल. शारीरिक थकवा दूर झाल्यानंतर मन शांत होते आणि फ्रेश वाटते.
पायांमधील वेदना कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्यात पाय ठेवावे. यामुळे लवकर आराम मिळतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर किंवा पायांमध्ये वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी तुरटीच्या पाण्यात पाय ठेवून बसावे. यामुळे शरीर आणि पायांचे दुखणे कमी होऊन आराम मिळेल.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पायांना आलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पाण्यात पाय घालून बसू शकता. यामुळे पायांना आलेली सूज लगेच कमी होईल. युरिक अॅसिड वाढल्यामुळे किंवा जखम झाल्यामुळे पायांना सूज येते. अशावेळी तुरटीच्या पाण्याचा वापर करावा. पायांमुळे पायांना आलेली सूज कमी होईल.