पीसीओसच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा 'ही' योगासने
बदलत्या जीवनशैलीचा आणि वातावरणाचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्वच महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिन्यातील चार ते पाच दिवसांच्या मासिक पाळीत महिलांमध्ये अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. या दिवसांमध्ये पोटात दुखणे, कंबर दुखणे, मूड स्विंग होणे, पाय दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. तसेच हल्ली महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम किंवा PCOS चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पीसीओसची समस्या उद्भवू लागल्यानंतर जीवनशैलीमध्ये बदल होऊ लागतो.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वजन वाढणे, डायबीटीज, रक्तदाब, हार्मोन्स असंतुलन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. यामुळे महिला शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. पीसीओसची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्तीचे केस, पुरळ, असामान्य वजन वाढणे, केस पातळ होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. मासिक पाळीतील समस्या उद्भवू लागल्यानंतर महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला पीसीओसच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. ही योगासने केल्यास पीसीओसच्या समस्येपासून आराम मिळेल.(फोटो सौजन्य-istock)
चक्की चालनासन करणे अतिशय सोपे आहे. योगासन करताना नेहमी योगा मॅटचा वापर करा. ज्यामुळे कोणतीही इजा होणार नाही.चक्की चालनासन करताना सर्वप्रथम योगा मॅटवर पाय मोकळे करून बसा. त्यानंतर गोलाकार स्थितीमध्ये हालचाली करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल. हे आसन करताना हात खांद्याच्या रेषेत समोर घेऊन बोटे एकमेकांमध्ये गुंतून जात फिरवतात तशा गोलाकार हालचाली करा.
सुप्त बद्ध कोनासन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हे आसन करताना आतील मांड्यांवर खोलवर ताण येईल. ज्यामुळे शरीराचा खालचा भाग शांत स्थितीमध्ये राहील. त्यानंतर शांत झोपा. यामुळे पीसीओसचा त्रास कमी होईल आणि आराम मिळेल.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बद्ध कोनासन केल्यामुळे मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळेल. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना होणार नाही. हे आसन करताना दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये फोल्ड करून त्यानंतर तळवे एकमेकांना जोडून हातानी पकडा आणि पायांच्या हालचाली करा. यामुळे पीसीओसच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होईल.