मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी असेल तर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. पण काही लोक शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे जीवन जगताना आनंद आणि उत्साहाने जगले पाहिजे. शरीरात मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर सतत चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे, कोणत्याही गोष्टीचा उत्साह नसणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे सतत तणावात जगण्याऐवजी नेहमी हसत खेळत जीवन जगावे.
शरीरात आहार आणि व्यायामाचा अभाव निर्माण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे आहारात पौष्टिक घटकांचे सेवन करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक निरोगी आणि तणावमुक्त होईल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आहारात पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. भाज्या खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. भाज्यांमध्ये आढळून येणारे विटामिन, खनिजे, मिनरल्स आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. त्यामुळे चुकीचा आहार न घेता आरोग्याला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. रोजच्या आहारात नेहमी कांदा, टमाटर, पालक, ब्रोकली, बीट, गाजर, पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. रोजच्या आहारात जास्तीत जास्त भाज्यांचे सेवन करावे, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहील.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. फळे खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात एक सफरचंदाचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहील. आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. सफरचंद, संत्री, अननस, मोसंबी, पेरू, केळी आणि हंगामी फळांचे सेवन करावे. विटामिन सी युक्त फळांचे आहारात सेवन केल्यामुळे त्वचा आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात फळांचे सेवन करावे.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सकाळी उठल्यानंतर नियमित 4 ते 5 बदाम खावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगले राहण्यास मदत होते. नियमित ड्रायफ्रूटचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता दूर होईल आणि आरोग्य सुधारेल. सतत चक्कर येत असल्यास किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास आहारात ड्रायफ्रूटचे सेवन करावे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.