Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात कायमच गॅस होतो? मग दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, बद्धकोष्ठता-लिव्हरच्या समस्या होतील दूर

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पुदिना आणि आल्याचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2025 | 11:17 AM
पोटात कायमच गॅस होतो? मग दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

पोटात कायमच गॅस होतो? मग दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष द्यावे. काहींना जेवल्यानंतर लगेच पोट फुगणे, गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यासोबतच पचनाच्या समस्या सुद्धा उद्भवू लागतात. त्यामुळे कायमच शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटात वाढलेल्या गॅसमुळे कायमच अस्वस्थ वाटू लागते. याशिवाय वारंवार उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसून येतात. यामुळे काहीवेळा लिव्हरचे आजार, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे, गर्भावस्था इत्यादी आजार होऊ शकतात. बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात बीन्स, डाळी, ब्रोकोली, कोबी, जास्त मीठ असलेले पदार्थ आणि दुधाचे पदार्थ खाल्यामुळे बद्धकोष्ठता वाढते.(फोटो सौजन्य – istock)

Worst Food For Kidney: किडनी सडवतात 8 पदार्थ, नाश्त्यात भरभरून खात आहेत लोक, 1 दिवसात होतील स्टोन

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

आलं पुदिन्याच्या चहाचे सेवन:

पोटात वाढलेला गॅस आणि मळमळ कमी करण्यासाठी आलं पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेला विषारी वायू बाहेर पडून जातो आणि आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे. इंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील गॅस कमी करण्यासाठी आलं अतिशय प्रभावी ठरते. आल्याचा चहा बनवताना पाणी गरम करून त्यात किसलेले आलं टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर पुदिन्याची पाने टाकून काहीवेळा उकळवून घ्या.

बडीशेपच पाणी:

बडीशेप खाल्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहील. पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर बडीशेपचे पाणी प्यावे. यामध्ये असलेले गुणकारी घटक पोटात वाढलेला गॅस कमी करतात. बडीशेपचे पाणी तयार करताना पाण्यात बडीशेप, आलं, हिंग, काळे मीठ घालून व्यवस्थित उकळवून घ्या. हे पाणी उपाशी पोटी प्यायल्यास पोटात वाढलेला गॅस कमी होईल.

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘हे’ पाणी ठरेल प्रभावी, शरीर होईल डिटॉक्स

हिंग जिऱ्याचा तडका दिलेले पदार्थ:

रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचे धान्यांचे सेवन केले जाते. हे पदार्थ बनवताना कायमच हिंग आणि जिऱ्याचा वापर करावा. ज्यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होतो आणि अपचन होत नाही. शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहण्यासाठी ओवा, हिंग, धणे, बडीशेप आणि जिऱ्याची पावडर इत्यादी मसाल्यांचा तडक जेवणाला द्यावा.

FAQs (संबंधित प्रश्न)

ब्लोटिंगची सामान्य कारणे:

जास्त खाणे, पोटात गॅस तयार करणारे अन्न किंवा विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी झाल्यामुळे ब्लोटिंग होते.

ब्लोटिंगची लक्षणे:

पोटात घट्टपणा किंवा भरल्यासारखे वाटणे.पोटात अस्वस्थता किंवा वेदना.पोटात गॅसची भावना किंवा बाहेर पडणे.पोटाचा आकार वाढणे किंवा सुजणे.

कधी डॉक्टरांना भेटावे?

घरगुती उपाय करूनही फरक न पडल्यास.फक्त फुगण्याव्यतिरिक्त इतर गंभीर लक्षणे असल्यास, जसे की तीव्र वेदना, आतड्यांच्या सवयींमध्ये बदल (सतत अतिसार किंवा बद्धकोष्ठता), रक्तस्त्राव किंवा वजन कमी होणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do you always have gas in your stomach then include these foods in your daily diet constipation liver problems will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • bloating
  • Digestion Problem
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कायमच हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात? कारण ऐकून व्हाल आश्चर्यचकित
1

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कायमच हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात? कारण ऐकून व्हाल आश्चर्यचकित

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, तणावापासून मिळेल कायमची सुटका
2

वयाच्या ६० व्या वर्षांनंतर हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, तणावापासून मिळेल कायमची सुटका

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू
3

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, खोकला होईल गायब
4

हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, खोकला होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.