दैनंदिन आहारात मध आणि आलं खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तर आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात आलं आणि मधाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आल्याचा रस करून त्यात मध मिक्स करून खाल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाऊन शरीर स्वच्छ होईल. तसेच आलं मध खाण्याचे इतरही फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
आलं आणि मध खाण्याचे फायदे
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित मध आल्याचे सेवन करावे. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
आल्यामध्ये विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आलं मधाचे सेवन करावे. यामुळे तुम्ही ताप आणि इतर विषाणूंपासून दूर राहता.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात आल्याचा रस आणि मध मिक्स करून पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीराचे वाढलेले वजन कमी होईल.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म चिंता तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो.