फोटो सौजन्य: Freepik
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक जण मग लहान असो कि मोठा, सगळेच जण मोबाईल किंवा लॅपटॉपवर तासंतास वेळ घालवत असतात. यामुळे शरीराची हालचाल होत नाही, परिणामी लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. पण ही तर झाली एक समस्या. अशा कित्येक समस्या आहेत ज्याचे कारण मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाढणारा स्क्रीन टाइम आहे. यातीलच एक समस्या म्हणजे डोळ्यांची दृष्टी कमी होणे. पण उत्तम आहार तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे.
हे देखील वाचा: जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लसणाचे सेवन करत असाल, तर जाणून घ्या तोटे
अनेक संशोधनांमध्ये असेही दिसून आले आहे की झिंक, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीन समृध्द अन्न खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित जोखीम 25% कमी होऊ शकतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, झेक्सॅन्थिन, ल्युटीन आणि बीटा कॅरोटीन हे देखील डोळ्यांसाठी उत्तम अन्न आहेत. अशा परिस्थितीत, दृष्टी सुधारण्यासाठी आहारात काय समाविष्ट केले पाहिजे त्याबाबद्दल आपण पुढे जाणून घेऊया.
शेंगदाणे आणि शेंगा: शेंगदाणे आणि शेंगा झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सीडन्ट्सने भरलेले असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. या पदार्थांमुळे डोळ्यांना पोषण मिळतो आणि दृष्टीला धार येते.
आंबट फळं: आंबट फळं जसे की संत्री, पेरू आणि कीवी मध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतो. व्हिटॅमिन सी डोळ्यांची सुरक्षा करण्यास मदत करतो आणि मोतियाबिंदासारख्या रोगांपासून संरक्षण प्रदान करतो.
हिरव्या पालेभाज्या: पालक, मेथी आणि कोलार्ड ग्रीन्स या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांनी डोळ्यांच्या उत्तेजनास मदत होते आणि त्यांची सुरक्षा केली जाते.
अंडी: अंड्यांमध्ये झिंक, ल्युटीन, आणि विटॅमिन बी12 असतो, ज्यामुळे डोळ्यांचा आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते.
मासे: सॅल्मन, मॅकेरेल आणि टुना सारख्या मासांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् मोठ्या प्रमाणात असतात. हे फॅटी ऍसिडस् डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सूजन कमी करतात.
या सर्व पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करून आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि दृष्टीला अधिक चांगले होऊ शकतो. त्यामुळे, स्क्रीनवरील वेळ कमी घालवण्यासोबतच, योग्य आहाराच्या मदतीने आपल्या डोळ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करा आणि नेहमी चांगल्या सवयीचा अवलंब करा.