Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ होईल कमी

पावसाळ्यात पायांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे पायांमध्ये जळजळ किंवा त्वचा निघून जाते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय केल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 27, 2026 | 08:02 AM
पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय, जळजळ होईल कमी

पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय, जळजळ होईल कमी

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग का वाढतो?
बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी उपाय?
संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आवर्जून उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे पाय कुजणे किंवा बोटांमध्ये जखमा होणे. ओले शूज, दमट हवामान, पायांवरील सततचा ओलसरपणा इत्यादी कारणांमुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. यामुळे पायांना खाज येणे, त्वचा लाल होणे, कातडी निघणे, जळजळ आणि बोटांच्या मधोमध अस्वस्थता जाणवणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. Athlete’s Foot किंवा Tinea Pedis झाल्यानंतर पायांमध्ये खूप जास्त जळजळ होते. पाय जमिनीवर टेकवणे सुद्धा अवघड होऊन जाते. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम किंवा अँटीफंगल क्रीम आणून पायांवर लावल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने अँटीफंगल क्रीमचा वापर केल्यास पायांवर जखमा आणखीनच वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

पावसाळ्यात पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग का वाढतो?

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात बदल होतो. सगळीकडे गारवा निर्माण झाल्यामुळे गर्मीपासून काही प्रमाणात सुटका मिळते. पण या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित असंख्य वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. दीर्घकाळ पाय ओले राहिल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षक स्तर कमजोर होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे बुरशी सहजपणे त्वचेच्या आत प्रवेश करते. हवा खेळती न राहणारे बंद शूज, ओले झालेले मोजे किंवा तासनतास ओल्या जागी उभे राहिल्यामुळे पायांमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. ओलसरपणा, जिम, स्विमिंग पूल किंवा दुसऱ्याचे टॉवेल आणि चप्पल वापरल्याने बुरशीचे जिवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात.

संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी:

पावसाळ्यात पायांमध्ये वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी योग्य ते घरगुती उपाय करावेत. पाय सौम्य साबणाने स्वच्छ धुवून नंतर व्यवस्थित कोरडे करून घ्या. पायांच्या बोटांमधील जागा पूर्णपणे कोरडी आणि स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. मोजे नेहमी स्वच्छ घालावेत. चपला किंवा सँडल्सचा वापर करताना त्यातील हवा कायमच खेळती राहावी. पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये टॉवेल, मोजे आणि चप्पल पूर्णपणे वैयक्तिक ठेवाव्यात. शूजमध्ये ‘एंटीफंगल पावडर’ वापरल्यास मदत होते.

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

बुरशीजन्य संसर्गावर मात करण्यासाठी योग्य उपाय:

टर्बिनाफाइन, क्लोट्रिमाझोल, मायकोनाझोलयुक्त क्रीम्स बुरशीची वाढ थांबवून पायांमध्ये वाढलेली खाज आणि जळजळ कमी होते. पायांमध्ये वाढलेल्या इन्फेक्शनवर वेळीच लक्ष न दिल्यास जखमा पाण्याच्या नखांपर्यंत पोहचण्याची जास्त शक्यता असते. संसर्ग झाल्यानंतर खाजवल्याने त्वचा दुखावली जाते, ज्यामुळे जंतू आणखीनच वाढतात. पायांमध्ये झालेल्या जखमा कमी करण्यासाठी खोबरेल तेल किंवा मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवावे. यामुळे जखमांवरील जंतू नष्ट होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पायांना सतत खाज का येते?

    Ans: पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग (नायटा), जास्त घाम येणे, ओलसरपणा, अॅलर्जी किंवा त्वचा कोरडी पडणे यामुळे सतत खाज येऊ शकते.

  • Que: नायट्यावर घरगुती उपाय कोणते आहेत?

    Ans: टी ट्री ऑइल, खोबरेल तेल, हळद, कडुनिंबाची पाने, अॅलोवेरा जेल यांसारखे नैसर्गिक उपाय काही प्रमाणात खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. मात्र हे उपाय वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत.

  • Que: नायटा कायमचा बरा होऊ शकतो का?

    Ans: योग्य उपचार, स्वच्छता आणि पाय कोरडे ठेवण्याची सवय यामुळे नायटा पूर्णपणे बरा होऊ शकतो. संसर्ग वारंवार होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Do your feet itch constantly try these home remedies to get permanent relief from ringworm and reduce the burning sensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • fungal infection
  • home remedies
  • monsoon care

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
1

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
3

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.