
Cold Water : थंड पाणी पिल्याने पोटाला नुकसान पोहचते का? तज्ञांकडून जाणून घ्या खरं सत्य
Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय
थंड पाणी पचनावर परिणाम करते का?
डाॅक्टरांच्या मते, पचनाचा आणि पाण्याचा काहीही संबंध नसतो. आपण गरम किंवा थंड कोणत्याही स्वरुपाचे पाणी पिले तरी पोटात गेल्यानंतर त्याचे टेम्परेचर नाॅर्मल बनते. सामान्यपणे थंड पाण्याचा कोणत्याही प्रकारे आपल्या पचनावर परिणाम होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले नाही. काहींचा हा गैरसमज आहे की थंड पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी गोठू लागते पण वास्तवात असे काहीच घडत नाही. लोकांचा विश्वास आहे की, थंड पाणी प्यायल्याने खाल्लेलं अन्न आकुंचन पावते पण खरंतर असं काहीच नाहीये.
अतिथंड पाणी पिणे टाळा
हे लक्षात घ्या की, काही पोटाचे आजार जसे की इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) झाल्यास सेंसिटिव्हिटी वाढू लागते. या परिस्थितीत जर आपण थंड पाण्याचे सेवन केले तर आजरांच्या लक्षणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. डाॅक्टरांच्या मते, थंड पाणी प्यावे पण अतिथंड पाण्याचे सेवन आपण टाळायला हवे. उन्हातून घरी आल्यानंतर जर तुम्ही लगेच अतिथंड पाण्याचे सेवन केले तर याचा आपल्या बाॅडी टेम्परेचरवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्दी-खोकला सारखे आजार होण्याची शक्यता असते.
कोणी थंड पाण्याचे सेवन करु नये?
ज्यांना दमा, सायनस, मायग्रेनचा किंवा घशाचा संसर्गाचा त्रास आहे, लहान मुले, वृद्ध अशा लोकांनी थंड पाण्याचे सेवन करणे टाळावे. थंड पाणी कधीही गटागट पिऊ नये. याचबरोबर फार उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाण्याचे सेवन करु नये.