Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Diabetes Tips : फळांचा रस हा चवीला गोड असल्याने तो रक्तातील साखर वाढवतो की नाही याविषयी अनेक रुग्ण गोंधळले असतात. चला फ्रुट ज्यूस ब्लड शुगर लेव्हल वाढवते की नाही या प्रश्नामागचे खरं सत्य जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 08:15 PM
डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Follow Us
Follow Us:
  • फळांचा रस आणि संपूर्ण फळ यामध्ये पोषणमूल्याचा महत्त्वाचा फरक असतो.
  • सेवनाच्या प्रमाण आणि वेळेवर त्याचा शरीरावर परिणाम अवलंबून असतो.
  • रसातील घटक शरीरात वेगाने शोषले जाऊ शकतात.
डायबिटीस हा एक कधीही न बरा होणारा आजार आहे. हा आजार असलेल्या रुग्णांना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. रक्तातील साखर वाढल्याने हा आजार उद्भवून येतो. मधुमेह असलेल्या रुग्णांना गोड पदार्थांचे सेवन वर्ज्य केले जाते. अशात फळांचा रस देखील गोड असल्याने त्याचे सेवन करावे की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. फळांचा रस आरोग्यासाठी हेल्दी मानला जातो पण चवीला गोड असल्यामुळे मधुमेह रुग्णांनी याचे सेवन करावे की नाही याबाबत लोक गोंधळलेली असतात. ही समस्या थोडी गुंतागुंतीची आहे. सोशल मिडियावरही याविषयी अनेक दावे केले जातात पण खरं सत्य काय ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

बीडीआर फार्मास्युटिकल्सचे तांत्रिक संचालक डॉ. अरविंद बडीगर यांच्या मते, आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आहारात फळांच्या रसाचे सेवन एक चांगला पर्याय आहे. तथापि, रक्तातील साखरेच्या नियंत्रणावरील त्याचा परिणाम चिंतेचा विषय ठरू शकतो. फळांचा रस पिणे हानिकारक नसले तरी त्याच्या सेवनाच्या प्रमाणावर आणि वेळेवर ते अवलंबून असते. संशोधनातून असे समोर आले आहे की, फळांच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स हा मध्यम ते किंचित जास्त असतो. याचा अर्थ तो लवकर पचला जातो आणि सेवन केल्यानंतर काही वेळासाठी तो रक्तातील साखर वाढवू शकतो. हे सामान्य आहे की रसाच्या स्वरुपात तुम्ही काही प्रमाणात साखरेचे सेवन करत असता.

सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की, फळांचा रस पिणे आणि त्या फळाला थेट खाणे यात मोठा फरक असतो. संपूर्ण फळात फायबरचे प्रमाण अधिक असते जे शरीरातील साखरेचे शोषण मंदावते. तथापि, जेव्हा फळांचा रस तयार केला जातो तेव्हा त्यातील अधिकतर फायबर हे काढून टाकले जाते आणि फक्त साखरेचा द्रव शिल्लक राहतो. त्यामुळे फळाने नाही पण त्याच्या रसाने नक्कीच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

फळांचा रस हानिकारक असतो का?

याचा पूर्णपणे अर्थ असा नाही की फळांचा रस आरोग्यासाठी हानिकारक असतोच. अनेक अभ्यास आणि मेटा-विश्लेषणांमधून असे दिसून आले आहे की, जर फळांचा रस हा प्रमाणात पिला तर त्याचा मधुमेहावर थेट परिणाम होत नाही. मूळ समस्या ही रसात नाही तर त्याच्या प्रमाणात आहे.

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत

फळांच्या रसात साखर कशी काम करते?

फळांच्या रसातील नैसर्गिक शर्करा दोन प्रकारच्या असतात, यातील एकाला फ्रुक्टोज तर दुसऱ्याला ग्लुकोज असे म्हटले जाते. हे प्रक्रिया केलेल्या ड्रिंक्सहून वेगळे असते कारण ते थेट फळांमधून मिळत असते. हे लक्षात घ्या की, फळांचा रस पिण्याच्या पद्धतीत लक्षणीय फरक आहे. रस काढल्याने फळांमधील बहुतेक फायबर निघून जाते. पण शरीराला फायबर अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते शरीरातील साखरेचे शोषण मंदावते. फायबरशिवाय, रसातील शर्करा अधिक वेगाने शोषली जाते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Does fruit juice increase blood sugar know the truth from experts lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Diabetes Tips: डायबिटीसच्या रुग्णांनी रोज जांभूळ खाल्ल्याने काय होईल? खरंच मधुमेह कमी होतो, काय आहे तथ्य
1

Diabetes Tips: डायबिटीसच्या रुग्णांनी रोज जांभूळ खाल्ल्याने काय होईल? खरंच मधुमेह कमी होतो, काय आहे तथ्य

Relationship Tips : घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ, फक्त कुंडलीच नाही तर पार्टनरसोबत या गोष्टीही जुळणं महत्त्वाचं!
2

Relationship Tips : घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ, फक्त कुंडलीच नाही तर पार्टनरसोबत या गोष्टीही जुळणं महत्त्वाचं!

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट
3

How To Tighten Loose Jeans : दररोज वापरुन जीन्स सैल झालीये? मग या सोप्या पद्धतीने घरीच करा टाईट

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?
4

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.