
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश
मधुमेह वाढण्याची कारणे?
मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मधुमेह, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीराला तरुण वयात कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर जीवन गोळ्या औषधांचे सेवन करून काढावे लागते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवायच्या, मात्र जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे तरुण वयात आजारांना सामोरे जावे लागते. मधुमेहासारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर औषधांचे सेवन करावे लागते. मधुमेह हा कधीच न बरा होणारा आजार आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत
मधुमेह झाल्यानंतर शरीरात इन्सुलिन तयार होण्यास अडथळा येतो किंवा शरीर त्याचा योग्य वापर करत नाही, ज्याच्या परिणामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह, टाइप २ मधुमेह यापैकी कोणत्याही मधुमेहाची लागण झाल्यास शरीराला हानी पोहचते. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर जखमा होतात. या जखमा पूर्णपणे बऱ्या न झाल्यामुळे बाधित अवयव कापून टाकावा लागतो. चला तर जाणून घेऊया मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत? याबद्दल सविस्तर माहिती.
सफरचंदामध्ये विद्रव्य फायबर आणि पेक्टिन मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू वरदान मानला जातो. रक्तातील साखरेला स्थिर ठेवण्यासाठी आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पेरूचे सेवन करावे. संत्री, मोसंबी यांसारख्या फळांमध्ये विटामिन ‘सी’ आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि रक्तातील सारखं नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबट फळांचे सेवन करावे. जांभूळ, स्ट्रॉबेरी किंवा ब्ल्यूबेरी यांसारख्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त असतात. इन्सुलिनची संवेदनशील सुधारण्यासाठी स्ट्रॉबेरी किंवा ब्ल्यूबेरी यांसारख्या फळांचे सेवन करावे.
Ans: होय, काही लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास त्वचा कोरडी होणे, डिहायड्रेशन किंवा त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढल्यामुळे खाज जाणवू शकते.
Ans: पेरू, सफरचंद, पपई, बेरीज प्रकारातील फळे, संत्री यांसारखी फायबरयुक्त फळे संतुलित प्रमाणात आहारात घेता येतात.
Ans: फायबरयुक्त पदार्थ, संतुलित आहार, कमी प्रक्रिया केलेले पदार्थ आणि नियमित आहाराच्या सवयी ठेवणे उपयुक्त ठरू शकते.