Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय
तज्ज्ञांच्या मते, ३५ वर्षांनंतर महिलांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दूध, दही, पनीर, तीळ आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. यामुळे हाडं आणि दात मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.
स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. डाळी, अंडी, सोयाबीन, कडधान्ये आणि ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. यामुळे शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत मिळू शकते.
तज्ज्ञांच्या मते, ३५ वर्षांनंतर महिलांनी व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३युक्त पदार्थांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीमुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते, तर ओमेगा-३ हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सूर्यप्रकाश, मासे, अक्रोड आणि जवस यांसारखे पदार्थ शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात.
अनेक महिलांमध्ये आयरनच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. पालक, बीट, डाळिंब आणि खजूर यांसारखे पदार्थ फायदेशीर मानले जातात. तसेच फायबरयुक्त फळे, भाज्या आणि ओट्समुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
वाढत्या वयानुसार मानसिक ताणाचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर अधिक दिसू शकतो. सततचा ताण हार्मोनल बदल, थकवा आणि झोपेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे योग, ध्यान आणि नियमित शारीरिक हालचाल यांचा दिनचर्येत समावेश केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.
Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत






