Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लासभर कोमट पाणी! डिटॉक्सपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत शरीराला होतील भरमसाट फायदे

सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल, स्किन ग्लोइंग दिसेल, वजन कमी होण्यास मदत इत्यादी भरमसाट फायदे होतात. त्यामुळे उपाशी पोटी थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाण्याचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 07:57 AM
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लासभर कोमट पाणी! डिटॉक्सपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत शरीराला होतील भरमसाट फायदे

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लासभर कोमट पाणी! डिटॉक्सपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:

कोमट पाणी पिण्याचे फायदे?
कोमट पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे?
कोणत्या वेळी कोमट पाणी प्यावे?

दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहात जावी, असे सगळ्यांना कायमच वाटत असते. यासाठी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. निरोगी आरोग्यासाठी पाणी प्यायले जाते, पण योग्य पद्धतीमध्ये पाण्याचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. अनेक लोक उपाशी पोटी थंड पाणी, चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. पण उपाशी पोटी कॅफिन असलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढून संपूर्ण आरोग्य बिघडते. थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत आणि आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. वारंवार पचनाच्या समस्या किंवा पोटात जडपणा जाणवत असेल तर उठल्यानंतर सगळ्यात आधी एक ग्लासभर कोमट पाणी प्यावे. पाण्यात तुम्ही लिंबाचा रस किंवा तूप मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया कोमट पाणी प्यायल्यास शरीराला होणारे भरमसाट फायदे.(फोटो सौजन्य – istock)

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास शरीराला होणारे फायदे:

कोमट किंवा गरम पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी आणि सक्रिय राहण्यास मदत होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्यांपासून कायमची सुटका हवी असल्यास नियमित न चुकता उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे. शरीरातील घाण बाहेर पडून गेल्यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधित कोणतेही आजार होत नाही आणि पचनक्रिया चांगली राहते.

गरम पाण्याच्या सेवनामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. पाणी रक्तवाहिन्यांमध्ये पसरल्यामुळे टिश्यू आणि शरीराच्या विविध भागांपर्यंत ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. रक्तात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यासोबतच बीटचा रस किंवा पालकचा रस प्यावा. यामुळे रक्त सुद्धा होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते.

कोमट पाणी नर्व्हस सिस्टिम एक्टिव्हेट करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरावर वाढलेला ताण कमी होतो आणि आराम मिळतो. कोमट पाण्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टिमला सुद्धा आराम मिळतो. तब्येत चांगली ठेवण्यासाठी कोमट पाणी प्यावे. झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे झोप चांगली लागते आणि उठल्यानंतर फ्रेश वाटते.

Parenting Tips: सुट्टीत मुलांचा स्क्रीनटाइम वाढलाय? मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महागडे डाएट, सप्लिमेंट्स तर काहीवेळा क्रश डाएटसुद्धा केला जातो. यामुळे शरीरावर फारसा परिणाम दिसून आला नाही की पुन्हा एकदा डाएटमध्ये बदल केला जातो. हे सर्व उपाय करण्याऐवजी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस, मध किंवा चमचाभर तूप मिक्स करून प्यायल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. महिला आणि पुरूषांमधील मेटाबॉलिझ्म सुधारण्यासाठी कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. नियमित महिनाभर उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर आलेले मुरूम, पिंपल्स आणि फोड कायमचे कमी होऊन त्वचेवर ग्लो येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारू शकते आणि दिवसाची सुरुवात ताजेतवानेपणे होऊ शकते.

  • Que: कोमट पाणी पिल्याने त्वचेला फायदा होतो का?

    Ans: पुरेसे पाणी पिल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी दिसू शकते.

  • Que: दिवसातून किती वेळा कोमट पाणी प्यावे?

    Ans: व्यक्तीच्या वय, हवामान, शारीरिक हालचाली आणि आरोग्यानुसार पाण्याची गरज बदलते. तहान आणि शरीराची गरज लक्षात घेऊन पाणी प्यावे.

Web Title: Drink a glass of warm water regularly after waking up in the morning from detox to glowing skin the body will have immense benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • Boiling Water
  • Drinking Water
  • Weight loss

संबंधित बातम्या

पोटावरची ढेरी २१ दिवसांमध्ये होईल कायमची गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, गंभीर आजारांपासून मिळेल सुटका
1

पोटावरची ढेरी २१ दिवसांमध्ये होईल कायमची गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, गंभीर आजारांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.