नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे
तूप खाण्याचे फायदे?
कोणत्या वेळी तुपाचे सेवन करावे?
तूप खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का?
भारतीय स्वयंपाक घरात आवर्जून पाहायला मिळणारा पदार्थ म्हणजे तूप. जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. अनेक लोक जेवण बनवताना सुद्धा तुपाचा वापर करतात. पण बऱ्याचदा वजन वाढेल किंवा शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढेल या भीतीने अनेक लोक तुपाचे सेवन करणे टाळतात. तूप खाण्याची कितीही इच्छा असली तरीसुद्धा तुपाचे सेवन केले जात नाही. पण दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. तुपामध्ये विटामिन ए, डी, ई, के आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चमचाभर तूप नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
अनेकांच्या मनात तूप खाण्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. तुपाचे सेवन केल्यामुळे वजन वाढते? शरीरावर अनावश्यक चरबीचे प्रमाण वाढू लागते. पण असे नसून तूप वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते. तुपामध्ये MCTs नावाचे गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे फॅट्स शरीरात साठून राहत नाहीत. ते लिव्हरद्वारे त्वरित ऊर्जेमध्ये रूपांतरित होतात. तूप खाल्ल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकते. पण आहारात शुद्ध तुपाचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अजिबात कोलेस्ट्रॉल वाढत नाही. गायीच्या शुद्ध तुपामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज हे केवळ सॅच्युरेटेड फॅट्समुळे नाहीतर शरीराला आलेली सूज, ट्रान्स फॅट्स, डालडा, रिफाइंड शुगर च्या अतिसेवनामुळे सुद्धा वाढू लागते. त्यामुळे आहारात शुद्ध गाईच्या तुपाचे सेवन करावे. तूप खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात.
सामान्य निरोगी व्यक्ती नियमित १ ते २ चमचा तूप खाऊ शकते. यामुळे वजन वाढण्याचा कोणताही धोका निर्माण होणार नाही. तूप खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक फॅटी ॲसिड्स मिळतात. तूप खाताना ते कच्चे खाण्याऐवजी डाळभात किंवा खिचडी बनवल्यानंतर त्यावर टाकून खावे. याशिवाय बद्धकोष्ठता टाळण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात चमचाभर तूप टाकून प्यायल्यास पचनाच्या आजारांपासून सुटका मिळेल. याशिवाय आतड्यांमध्ये मऊपणा टिकून राहण्यास मदत होईल.
Ans: मर्यादित प्रमाणात तूप खाल्ल्याने सर्वसाधारणपणे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात असे ठोसपणे म्हणता येत नाही. मात्र, अति प्रमाणात संतृप्त चरबीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकते. त्यामुळे प्रमाण महत्त्वाचे आहे.
Ans: तूप सकाळच्या नाश्त्यात, गरम भात किंवा पोळीबरोबर तसेच दुपारच्या जेवणात घेतले जाऊ शकते. यामुळे पचनास मदत होऊ शकते.
Ans: अति प्रमाणात तूप खाल्ल्यास काही लोकांमध्ये LDL (वाईट) कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.






