दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा
दिवाळी सणाला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या दिवशी घरात रोषणाई करून दिव्यांची सजावट,कंदील आणि रांगोळी काढली जाते. याशिवाय नवीन कपडे आणि घरात दिवाळीचा फराळ बनवला जातो. दिवाळीच्या आधी प्रत्येक घरात साफसफाई आणि फराळाची मोठी लगबग असते. फराळात नेमकं काय काय बनवावं, असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. दिवाळीच्या फराळात लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या इत्यादी पदार्थ बनवले जातात. या पदार्थांसोबतच तुम्ही कुरकुरीत मखाण्यांचा चिवडासुद्धा बनवू शकता. मखाणा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.यामध्ये असलेले पोषक घटक वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत करतात. वजन वाढल्यानंतर संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर मखाणा खाल्ला जातो. दिवाळीमध्ये कायमच पोहे, शेव किंवा मक्याचा चिवडा बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मखाणा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)
गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल