Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

swollen feet causes: पायांना वारंवार सूज येणे ही केवळ थकवा किंवा जास्त वेळ उभे राहण्याची समस्या नसून, किडनी, हृदय, यकृत किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित गंभीर आजारांचेही लक्षण असू शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 07:08 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:
  • पाय सुजण्यामागील सामान्य कारणे
  • या गंभीर आजारांचे असू शकते संकेत
  • कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?
दिवसभर उभे राहणे, सलग प्रवास करणे किंवा बराच वेळ एकाच जागी बसून राहणे यामुळे पायांना तात्पुरती सूज येऊ शकते. मात्र ही सूज वारंवार दिसत असेल, अनेक दिवस कायम राहत असेल किंवा त्यासोबत वेदना, लालसरपणा, त्वचेत ताण जाणवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ती शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचा इशारा असू शकते. काही वेळा हे हृदय, किडनी, यकृत किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित गंभीर आजारांचे सुरुवातीचे लक्षणही असू शकते. त्यामुळे ही समस्या वारंवार जाणवत असल्यास वेळीच तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Health Tips: पायऱ्या चढताना दम लागतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळीच व्हा सावध

पाय सुजण्यामागील सामान्य कारणे

अतिप्रमाणात मीठाचे सेवन, जास्त वेळ उभे राहणे किंवा बसून काम करणे, गर्भधारणा, लठ्ठपणा, वाढते वय तसेच काही औषधांचे दुष्परिणाम यांमुळे पायांना सूज येऊ शकते. अशावेळी जर, विश्रांती घेतल्यानंतर सूज कमी होत असेल, ही सामान्य बाब असू शकते. मात्र सूज वारंवार होत असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

या गंभीर आजारांचे असू शकते संकेत

  • हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरात द्रव साचू लागतो. त्यामुळे पाय आणि घोट्यांना सूज येऊ शकते.
  • किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास अतिरिक्त पाणी आणि सोडियम शरीरातून बाहेर पडत नाही. परिणामी पायांमध्ये सूज निर्माण होऊ शकते.
  • यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि सूज येण्याची शक्यता वाढते.
  • शिरांमधील रक्तप्रवाह मंदावल्यास किंवा शिरांमध्ये समस्या निर्माण झाल्यास पाय सुजू शकतात.
  • एका पायात अचानक सूज, तीव्र वेदना, जडपणा किंवा त्वचेचा रंग बदलणे ही गंभीर स्थितीची लक्षणे असू शकतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?

पायांच्या सूजेसोबत छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, त्वचा लाल किंवा गरम होणे, एका पायातच अचानक सूज येणे किंवा चालताना तीव्र वेदना जाणवणे ही धोक्याची लक्षणे मानली जातात.

डॉक्टर कोणत्या तपासण्या सांगतात?

रुग्णाच्या लक्षणांनुसार रक्त आणि लघवीच्या तपासण्या, किडनी व यकृताच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या, ईसीजी, इकोकार्डिओग्राफी तसेच पायांच्या रक्तवाहिन्यांचे डॉप्लर अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. यामुळे सूजेमागील नेमके कारण शोधणे सोपे होते.

सूज कमी ठेवण्यासाठी काय करावे?

  • पाय काही वेळ उशीवर ठेवून विश्रांती घ्या.
  • सलग बसणे किंवा उभे राहणे टाळा.
  • नियमित चालणे किंवा हलका व्यायाम करा.
  • आहारातील मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवा.
  • योग्य आकाराची आणि आरामदायी पादत्राणे वापरा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा.

वेळीच निदान महत्त्वाचे

पायांना येणारी प्रत्येक सूज गंभीर आजाराचे लक्षण असतेच असे नाही. मात्र ती सतत होत असेल, वाढत असेल किंवा इतर लक्षणांसह दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप

Web Title: Swollen feet causes heart kidney liver disease symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • health care news
  • Health Care Tips
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर
1

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी
2

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे
3

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
4

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.