Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि टॅनिंग घालवण्यासाठी काकडी तुळशीच्या पानांपासून बनवलेले टोनर वापरावे. यामुळे त्वचा हायड्रेट आणि फ्रेश राहते. जाणून घ्या टोनर बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 03:36 PM
कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश आणि ताजतवटवीत! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश आणि ताजतवटवीत! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे कडक ऊन पडते. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगाची काहिली होते आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरावरील त्वचा, चेहरा पूर्णपणे लाल होऊन जातो तर काहींच्या अंगावर लाल रॅश येतात. सतत येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावरील चमक कमी होऊन जाते. धूळ, माती आणि प्रदूषणाच्या ठिकाणी जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स, फोड आणि बारीक मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स फुटून गेल्यानंतर त्यांचे काळे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. हे डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या टोनर किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा फारसा फरक त्वचेवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम

सर्वच ऋतूंमध्ये त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा अतिशय चमकदार दिसते. आज आम्ही तुम्हाला काकडी आणि तुळशीच्या पानांचा वापर करून टोनर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा टोनर रात्री झोपण्याआधी किंवा मेकअप करण्याआधी नियमित वापरल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी होण्यासोबतच उन्हात गेल्यानंतर सुद्धा त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेले टोनर वापरावे.

टोनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • काकडी
  • तुळशीची पाने
  • गुलाब पाणी
  • लिंबाचा रस

टोनर बनवण्याची कृती:

टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काकडी किसून त्यातील रस काढून घ्या. त्याप्रमाणे तुळशीची पाने खलबत्यामध्ये टाकून बारीक कुटून त्यातील रस काढा. तयार केलेला काकडी आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र मिक्स करून त्यात गुलाब पाणी आणि लिंबाचा रस घालून एकत्र व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. तयार केलेले टोनर आठवडाभर फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकून राहते.

टोनर लावण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्वचा कोरडी करून चेहऱ्यावर टोनर स्प्रे करा. यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट आणि ग्लोइंग राहील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर जाताना मेकअप करण्याआधी तयार केलेले टोनर लावावे. त्यानंतर मेकअप केल्यास त्वचेवर जास्त घाम येणार नाही. टोनर लावल्यानंतर त्वचा पुसून न घेता टोनर चेहऱ्यावर तसेच ठेवावे. यामुळे ते त्वचेमध्ये शोषले जाईल. दिवसभरातून दोन ते तीन वेळा नियमित चेहऱ्यावर टोनर लावल्यास त्वचा सुंदर आणि उजळदार दिसेल. टोनर लावल्यामुळे त्वचा घट्ट होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आवर्जून काकडीचे सेवन केले जाते. यामध्ये ९० टक्के पाणी असते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडी त्वचेला हायड्रेट ठेवते तर तुळशीची पाने चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्यावर डाग कमी करून त्वचा आतून स्वच्छ करतात. चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी काकडी तुळशीचे टोनर वापरावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Face will look fresh and refreshed in hot summer make magical toner of cucumber tulsi leaves at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक
1

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

Summer Care Tips: उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम
2

Summer Care Tips: उन्हात गेल्यानंतर लगेच चक्कर आल्यासारखे वाटते? मग तातडीने करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, महिनाभरात होतील गुडघ्यापर्यंत लांबलचक केस
3

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, महिनाभरात होतील गुडघ्यापर्यंत लांबलचक केस

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय
4

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.