Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण

Fatty liver Real Causes: सामान्य वजन, नियमित व्यायाम आणि मधुमेह नसतानाही अनेक तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचे निदान होत असून ही समस्या वाढत आहे. पारंपरिक जोखीम घटकांबाहेरही यकृतात चरबी साचण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यामागचे कारण काय, जाणून घ्या

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 05:32 PM
Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण
Follow Us
Follow Us:
  • ना वजन जास्त, ना मधुमेह
  • तरीही फॅटी लिव्हर का होतो?
  • जाणून घ्या खरं कारण
कल्पना करा, तुमचे वय तिशीच्या आसपास आहे. तुमचे वजन सामान्य आहे, तुम्ही नियमित व्यायाम करता, मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा कोणताही इतिहास नाही. तरीही नियमित तपासणीत तुमच्या यकृतात (liver) चरबी साचल्याचे निदान होते. आजच्या घडीला अशी परिस्थिती काही अपवादात्मक राहिलेली नाही. भारतातील यकृतविकार तज्ज्ञांना अशा रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे, जे फॅटी लिव्हरच्या पारंपरिक जोखीम गटात बसत नाहीत. पूर्वी फॅटी लिव्हर हा आजार प्रामुख्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि अतिमद्यपानाशी संबंधित मानला जात होता. मात्र, आता संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) हा आजार बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींनाही होऊ शकतो. सैफी हॉस्पिटलचे डीएम (हेपॅटोलॉजी) व लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ, डॉ. चेतन कलाल यांनी फॅटी लिव्हर होण्यामागचे खरं कारण सांगितले आहे, जाणून घेऊयात.

Dizziness Causes: वारंवार चक्कर येतेय? दुर्लक्ष करू नका; असू शकतात ‘हे’ गंभीर आजार

यामागचे कारण काय?

यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता (Genetics). काही व्यक्तींमध्ये PNPLA3 सारख्या जनुकांमधील बदलांमुळे यकृतात चरबी साचण्याची प्रवृत्ती जन्मतःच अधिक असते. ही प्रवृत्ती दक्षिण आशियाई लोकांमध्ये, विशेषतः भारतीयांमध्ये, अधिक आढळते. त्यामुळे अनेक भारतीयांचे वजन सामान्य असतानाही त्यांना फॅटी लिव्हर होऊ शकतो.

याशिवाय, आहाराचा दर्जा देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कॅलरींचे प्रमाण योग्य असले तरी वारंवार साखरयुक्त पेये, मैद्याचे पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले (Processed) अन्न खाल्ल्यास यकृत अतिरिक्त साखरेचे चरबीत रूपांतर करते. ही प्रक्रिया हळूहळू सुरू राहते आणि वजन न वाढताही कालांतराने फॅटी लिव्हर होऊ शकतो.

सध्या संशोधक आतडे आणि यकृत यांच्या परस्पर संबंधावर (Gut-Liver Axis) विशेष भर देत आहेत. प्रक्रिया केलेले अन्न, वारंवार प्रतिजैविकांचा (Antibiotics) वापर, सततचा ताण आणि अपुरी झोप यांमुळे आतड्यांतील उपयुक्त जीवाणूंचे संतुलन बिघडते. त्यामुळे शरीरातील दाह (Inflammation) वाढतो आणि यकृतातील चरबीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पारंपरिक जोखीम नसलेल्या व्यक्तींमध्येही फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.

याशिवाय, हार्मोनल आणि चयापचयाशी (Metabolic) संबंधित समस्या देखील कारणीभूत ठरू शकतात. हायपोथायरॉईडीझम, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), इन्सुलिन रेझिस्टन्स आणि कोलेस्टेरॉलमधील बिघाड यांमुळे मधुमेह होण्यापूर्वीच यकृतात चरबी साचण्यास सुरुवात होऊ शकते.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. अनेकांना अल्ट्रासाऊंड किंवा नियमित रक्ततपासणीदरम्यानच हा आजार असल्याचे समजते. सुरुवातीच्या टप्प्यात योग्य जीवनशैलीतील बदलांमुळे हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. मात्र दुर्लक्ष केल्यास पुढे यकृताची सूज, फायब्रोसिस, सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि अगदी लिव्हर कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

महत्त्वाचा संदेश असा की, शरीराने सडपातळ किंवा निरोगी दिसत असल्याचा अर्थ यकृतही तितकेच निरोगी आहे, असे नाही. तुमचे वजन आणि रक्तातील साखर सामान्य असली, तरी तपासणीत फॅटी लिव्हर आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. यकृतातील फायब्रोसिसची तपासणी आणि मेटाबॉलिक जोखीम मूल्यांकन करून त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि जीवनशैलीतील योग्य बदल केल्यास यकृताचे गंभीर नुकसान टाळता येऊ शकते.यकृताच्या आरोग्याचा विचार करताना केवळ वजनकाट्यावर दिसणारा आकडा पुरेसा नसतो.

Quitting Tea Benefits: महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे

Web Title: Fatty liver normal weight causes masld india dr chetan kalal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Diabetics
  • Fatty Liver
  • Health Care Tips
  • liver care

संबंधित बातम्या

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
1

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
3

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.