
पोट स्वच्छ होऊन सुद्धा जडपणा जाणवतो? आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
आतड्यांचे आजार कशामुळे होतात?
पोटात जडपणा जाणवण्याची कारणे?
पोट स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय?
दैनंदिन आहारात होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन, जेवणाच्या चुकीच्या वेळा, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आतड्यांमधील घाण बाहेर पडून जण्याऐवजी आतड्यांमध्येच तशीच साचून राहते. ज्याच्या परिणामामुळे जडपणा, फुगलेपणा किंवा अपूर्ण रिकामेपणाची भावना जाणवते. या समस्या खराब पचनसंस्था आणि आतड्यांच्या आजाराचे संकेत असू शकतात. वारंवार पचनासंबंधित समस्या उद्भवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे, अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. IBS, आतड्यांमधील सूज, गॅस, जुनाट बद्धकोष्ठता आणि बॅक्टेरियल इम्बॅलन्स इत्यादी आतड्यांसंबंधित आजारांनी आरोग्य पूर्णपणे बिघडू शकते.(फोटो सौजन्य – istock)
निरोगी पचनसंस्था राहावी यासाठी अनेक लोक सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबू, तूप आणि इतर वेगवेगळे पदार्थ मिक्स करून पितात. पण वारंवार पोट स्वच्छ होऊन सुद्धा पोटामध्ये जडपणा जाणवत असेल तर आतड्यांची हालचाल आणि मेंदूमधील सिग्नल यामध्ये बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. आतड्यांना सूज आल्यानंतर किंवा आतड्यांसंबंधित आजार झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. चला तर जाणून घेऊया आतड्यांसंबंधित आजारांची सविस्तर माहिती.
आतड्यांच्या अस्तराला सूज आल्यानंतर किंवा जागा कमी झाल्यानंतर पोटात सूज येणे किंवा मल साचून राहिल्यामुळे जडपणा जाणवण्याची खूप जास्त शक्यता असते. मानवी आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही विषाणू असतात. ज्यावेळी वाईट बॅक्टेरिया तेव्हा अन्नाचे आंबवण जास्त होते आणि आतड्यांमध्ये गॅस वाढू लागतो. याशिवाय काहीवेळा पोट स्वच्छ झाल्यानंतर सुद्धा आतड्यांमध्ये साचून राहिलेला जुनाट मल बाहेर पडून न गेल्यामुळे जडपणा जाणवतो आणि अपचनाच्या समस्या उद्भवतात.
स्त्रियांमध्ये गर्भाशयातील गाठींचा दाब आतड्यांवर पडल्यामुळे पोटात जडपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. तसेच आतड्यांमध्ये छोटी गाठ किंवा पॉलिप्स झाल्यामुळे मल जाण्याचा मार्ग अरुंद होतो.ग्लुटेन किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर काहींना ऍलर्जीं येण्याची शक्यता असते, ज्याच्या परिणाम आतड्यांवर लगेच दिसून येतो.
पोट स्वच्छ होऊन सुद्धा आतड्यांमध्ये जडपणा जाणवत असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. याशिवाय जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल. तसेच जेवणानंतर ओवा आणि काळे मीठ एकत्र करून खाल्ल्यास अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी दही किंवा ताक नियमित प्यावे. आहारात पपई, पेरू आणि हिरव्या पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास आतडे स्वच्छ होतील. तसेच नियमित १० मिनिट वज्रासनात बसावे.
Ans: आतड्यांमध्ये सूज, पचनातील बिघाड, गॅस किंवा इन्फेक्शनमुळे पोट साफ झाल्यानंतरही जडपणा जाणवू शकतो.
Ans: पोटदुखी, फुगलेपणा, मळमळ, वारंवार जुलाब, अशक्तपणा आणि भूक न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: होय. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ, जंक फूड आणि अनियमित आहारामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.