जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे 'या' पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी
वजन वाढण्याची कारणे?
शेवग्याच्या पानांचे फायदे?
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
जगभरात लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे वेळीच योग्य उपाय करून वजन कमी करणे फार आवश्यक आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास एका जागेवर बसून राहणे, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचे कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. जिम, डाएट आणि महागडी प्रॉडक्ट्स, सप्लिमेंट्स इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
जीवनशैलीतील चुकीच्या सवयींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कायमच महागडे सप्लिमेंट्स किंवा डाएट करण्याऐवजी घरगुती उपाय करून वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे कशा पद्धतीने सेवन करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची पाने शरीरासाठी वरदान ठरतात. मेटाबॉलिझम सुधारणे, पचनक्रिया, त्वचा, केस इत्यादी सर्वच गोष्टींसाठी शेवग्याची पाने आणि पावडर खूप जास्त फायदेशीर आहे.
एक ग्लासभर कोमट पाण्यात शेवग्याची पावडर मिक्स करा. तयार केलेले पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावे. तुम्हाला हवे असल्यास पाण्यात तुम्ही लिंबाचा रस किंवा मध सुद्धा मिक्स करून पिऊ शकता. यामुळे चव चांगली लागेल. रिकाम्या पोटी शेवग्याच्या पाण्याचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. महिनाभर नियमित एक ग्लास पाण्यात शेवग्याची पावडर मिक्स करून प्यायल्यास झपाट्याने शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यासोबतच शरीर आतून स्वच्छ होईल आणि रक्त शुद्ध राहील.
शेवग्याची पावडर शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. या पानांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल आणि अनेक बायो ॲक्टिव्ह कंपाउंड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. याशिवाय रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या पावडरचे सेवन करू शकता. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी नियमित एक ग्लास पाण्यात शेवग्याची पावडर मिक्स करून प्यावी. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी केवळ शेवग्याच्या पानांचे नाहीतर संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली जगणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.






