फोटो सौजन्य - Social Media
दिवसभराची धावपळ, ऑफिसचं प्रेशर, आणि घरातली जबाबदारी यातून माणूस थकतोच. शरीराचं थकवा झोप घेतल्यावर जरी कमी होत असला, तरी मानसिक थकवा हा खूप वेळा दुर्लक्ष केला जातो. तोच हळूहळू स्ट्रेसमध्ये, मग चिडचिड, आणि पुढे जाऊन एंग्जायटीमध्ये बदलतो. त्यामुळेच थकवा केवळ आराम करून नाही तर मनाला शांतता देऊनही कमी करणं गरजेचं आहे. विशेषतः उन्हाळ्यात, गरम हवामान आणि घामामुळे मन अधिकच त्रस्त होतं. त्यामुळे मानसिक शांतता आणि ताजेपणा मिळवण्यासाठी काही साध्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे.
घराबाहेर काही वेळ हिरवळीत वेळ घालवल्यास थकवा लवकर उतरतो. झाडांची, मोकळ्या हवेमुळे मन प्रसन्न होतं. त्याचबरोबर, डोळे बंद करून निवांत एका जागी बसणं आणि एक गिलास थंड पाणी घोट घेऊन प्यायल्यानेही डोक्याचं भार कमी होतो. डिहायड्रेशनमुळे थकवा आणि चिडचिड वाढते, त्यामुळे वेळेवर पाणी पिणं गरजेचं आहे. अनेकदा आपण फार स्ट्रेसमध्ये असतो आणि त्यावेळी काहीही सुचत नाही, अशा वेळी एखादं मजेशीर व्हिडिओ, जुन्या आठवणी किंवा एखादा गंमतीशीर किस्सा मनात आणल्याने चेहऱ्यावर हसू येतं आणि स्ट्रेस दूर होतो.
संगीत हे देखील एक उत्तम मानसिक उपचार आहे. आपल्या आवडीचं संगीत ऐकलं की डोक्यात चाललेला कोलाहल थांबतो आणि मन हलकं वाटतं. शांत गाणी, क्लासिकल संगीत किंवा नेचर साउंड्ससुद्धा मनावर सकारात्मक परिणाम करतात. त्याचबरोबर, ब्रीदिंग एक्सरसाईज म्हणजेच गहरी श्वास घेणं आणि सोडणं हा एक असा उपाय आहे, जो केवळ काही मिनिटांत शरीर आणि मन दोन्ही शांत करू शकतो.
शेवटी, मेंटली फिट राहण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. रोज सकाळी थोडा योगा, मेडिटेशन करणं, हफ्त्यातून एकदा स्वतःला एखादी ट्रीट देणं, आवडती गोष्ट करणं, जसं की बागकाम, गाणं ऐकणं, चित्र काढणं – हे सगळं मनाला विश्रांती देतं. महिन्यातून एक सोलो ट्रिप किंवा दररोज संध्याकाळी थोडीशी चालणं यामुळेही मन प्रफुल्लित राहतं. त्यामुळे, थकवा आला की ‘No टेन्शन!’ म्हणत स्वतःसाठी वेळ काढा, आणि बघा दिवस किती सुंदर वाटतोय!






