Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, उलट्या- जुलाब थांबण्यासाठी करा घरगुती उपाय

दूषित अन्नपदार्थांचे सेवन किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होतात. चला तर जाणून घेऊया उलट्या, जुलाबावर घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 05:30 AM
उन्हाळ्यात Food poisoning झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे, उलट्या- जुलाब थांबण्यासाठी करा घरगुती उपाय

उन्हाळ्यात Food poisoning झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे, उलट्या- जुलाब थांबण्यासाठी करा घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

उलट्या जुलाब होण्याची कारणे?
डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी उपाय?
उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा का होते?

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये तापमानात सतत काहींना काही बदल होत असतात. वाढत्या गर्मीमुळे हानिकारक विषाणूंची झपाट्याने वाढ होते. तसेच उष्णता वाढल्यानंतर अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अन्नपदार्थांमध्ये विषाणूची पातळी वाढते. घरी शिजवलेल्या पदार्थांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यास जेवणाला बुरशी लागते. तसेच खराब झालेल्या पदार्थांमध्ये ‘साल्मोनेला’ किंवा ‘ई-कोलाय’ यांसारखे हानिकारक विषाणू वाढतात. बऱ्याचदा भूक लागल्यानंतर किंवा तहान लागल्यास उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा पाणी, सरबत प्यायले जाते. पण दूषित पाण्याचे आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अन्नावाटे हानिकारक विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्यानंतर शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात.(फोटो सौजन्य – istock)

भारतीय वंशाच्या अमेरिकन प्रोफेसरने बनवला खास ‘नेझल स्प्रे’, आता विनाशस्त्रक्रिया दिला जाणार मेंदूला स्पार्क

अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे क्षार झपाट्याने कमी होतात. वारंवार उलट्या किंवा जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. सतत होणाऱ्या उलट्या, जुलाबाकडे दुर्लक्ष केल्यास रक्तदाबाची पातळी झपाट्याने कमी होऊन खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात अन्नपदार्थांचे सेवन करणे पथ्य पाळणे फार आवश्यक आहे. आहारात कोणत्याही तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते. चला तर जाणून घेऊया उलट्या- जुलाब थांबण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.

उन्हाळ्यात जुलाब आणि उलट्या होण्याची प्रमुख कारणे :

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर तापमानात खूप जास्त वाढ होते. यामुळे अन्नातील ओलावा जिवाणूंना आकर्षित करतो आणि अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. अन्नपदार्थांमध्ये तयार झालेले हानिकारक जिवाणू शरीराच्या पचनसंस्थेवर तर काहीवेळा मेंदूच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे मिळेल तिथले पाणी प्यायले जाते. याच दूषित पाण्यामुळे कॉलरा किंवा टायफॉइडचा धोका वाढतो. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय रस्त्यावरील बर्फाचे गोळे, कापलेली फळे किंवा सरबत प्यायल्यामुळे विषाणू वाढण्याचा धोका जास्त असतो.

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

जुलाब, उलट्या थांबवण्यासाठी घरगुती उपाय:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरातील पाणी संतुलित ठेवणे फार आवश्यक आहे. कारण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होते. त्यामुळे नियमित ४ ते ६ लिटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाणी, ओआरएस पाणी प्यावे. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम युक्त घटक जुलाबावाटे बाहेर पडून गेलेली क्षारांची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. तसेच दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. ताकात असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची पातळी वाढवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Food poisoning म्हणजे काय?

    Ans: अस्वच्छ किंवा खराब अन्न खाल्ल्यामुळे होणाऱ्या संसर्गाला फूड पॉइझनिंग म्हणतात.

  • Que: फूड पॉइझनिंगची लक्षणे कोणती असतात?

    Ans: उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप, अशक्तपणा आणि डिहायड्रेशन ही सामान्य लक्षणे आहेत.

  • Que: उन्हाळ्यात फूड पॉइझनिंगचा धोका का वाढतो?

    Ans: उष्णतेमुळे अन्न लवकर खराब होते आणि त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात.

Web Title: Food poisoning in summer these serious symptoms appear in the body vomiting do home remedies to stop diarrhea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • health issue
  • home remedies
  • summer care tips

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात शरीरासाठी प्रभावी ठरेल ‘हे’ पाणीदार फळ, नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचेवर येईल चमक
1

उन्हाळ्यात शरीरासाठी प्रभावी ठरेल ‘हे’ पाणीदार फळ, नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचेवर येईल चमक

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Heat strokeपासून संरक्षण आवश्यक! उन्हामध्ये आरोग्याची कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांचे मत काय?
3

Heat strokeपासून संरक्षण आवश्यक! उन्हामध्ये आरोग्याची कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांचे मत काय?

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता
4

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.