भारतीय वंशाच्या अमेरिकन प्रोफेसरने बनवला खास 'नेझल स्प्रे', आता विनाशस्त्रक्रिया दिला जाणार मेंदूला स्पार्क
शास्त्रज्ञांनी मेंदूला पुन्हा ‘तरुण’ करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन प्रोफेसर अशोक शेट्टी यांनी एक विशेष नेझल स्प्रे विकसित केला आहे. हा स्प्रे मेंदूतील सूज कमी करण्यासोबतच स्मरणशक्ती सुधारण्यास आणि वाढत्या वयाचा मेंदूवर होणारा परिणाम उलटवण्यास मदत करतो. प्रोफेसर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या टीमने उंदरांवर केलेल्या चाचणीत असे आढळले की, या स्प्रेच्या केवळ दोन डोसमुळे मेंदूतील जुनी सूज वेगाने कमी झाली. हे तंत्रज्ञान भविष्यात डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या गंभीर आजारांच्या उपचारांत मैलाचा दगड ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)
जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं…
आपले वय वाढते तशी मेंदूमध्ये संथ पण सतत सूज म्हण्जेच ‘न्यूरो-इन्फ्लेमेशन निर्माण होऊ लागते. यामुळे मेंदूच्या पेशींची ऊर्जा कमी होते आणि स्मरणशक्ती कमकुवत होते. आतापर्यंत ही प्रक्रिया नैसर्गिक मानली जात होती.सप्रे थेट मेंदूच्या उत्तीपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची गरज उस्त नाही. त्यात असलेले बाह्यपेशीय पुटिका मायक्रोआरएनए बाहेर टाकतात, जे दाहक संकेतांना अवरोधित करतात आणि पेशीच्या ऊर्जा प्रणालीला पुन्हा सक्रिय करतात.
संशोधनानुसार, काही आठवड्यांतच उंदरांच्या स्मरणशक्तीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. हा उपचार नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या उंदरांवर समान रीतीने प्रभावी ठरला. उंदरांवरील चाचणी यशस्वी झाली असली तरी, मानवावरील चाचण्या अद्याप बाकी आहेत.या स्प्रेमध्ये एक्स्ट्रासेल्युलर वेसिकल्स असतात जे मायक्रो-आरएनए सोडतात. हे घटक मेंदूतील सुजेचे संकेत थांबवतात आणि पेशींची ऊर्जा प्रणाली पुन्हा सक्रिय करतात. शास्त्रज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान केवळ लक्षणे दाबत नाही, तर पेशींना आतून मजबूत बनवते.






