
भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका
Food Recipe: दुपारच्या जेवणात नेहमी नेहमी काय बनवावे सुचत नाही. भाजी, आमटी, डाळ, कढी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींकाही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त ईच्छा होते. अशावेळी तुम्ही दुुपारच्या जेवणासाठी दही तडका बनवू शकता. कामाच्या धावपळीमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या दह्याला या पद्धतीने फोडणी देऊन जेवणात काहीतरी वेगळे बनवू शकता. दह्याची आंबटसर चव आणि लाल तिखट मसाल्यांची फोडणी देऊन बनवलेला पदार्थ भात, पोळी किंवा पराठ्यासोबत छान लागतो. रोजच्या जेवणात कायमचं तेच ठराविक पदार्थ बनवून खाण्याऐवजी दह्याला फोडणी द्यावी. उन्हाळ्यात किंवा गरम हवामानात दही अतिशय आवडीने खाल्ले जाते. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेला पदार्थ सगळ्याचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – pinterest)