स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. 15 ऑगस्ट हा दिन दरवर्षी भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका मिळाली. अथक प्रयत्नानंतर आपला देश या दिवशी स्वातंत्र्य झाला आणि म्हणूनच हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करत असतो.
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाचा ध्वज उंच अवकाशात फडकवला जातो. तसेच या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हालाही हा दिवस हटके पद्धतीने साजरा करायचा असल्यास तुम्ही दिवसाची सुरुवात एका खास रेसिपीने करू शकता. आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा इडलीची एक चविष्ट रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी स्वातंत्र्यदिनाला आणखीन रंगत आणेल. तसेच घरातील इतर सदस्यही तुमचा हा आगळावेगळा प्रकल्प पाहून तुमच्यावर खुश होतील. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनला भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरी बनवा गुलाबाचा हलवा, वाचा सोपी रेसिपी