पार्ले बिस्कीट कोणला माहिती नाही. आता बाजारात कितीही नवनवीन बिस्किटे आले तरी पार्ले बिस्कीट कोणीही विसरू शकणार नाही. अनेकांच्या लहानपणीच हे एक फेव्हरेट बिस्कीट होत. आजही अनेकांना हे बिस्कीट तितकेच प्रिय आहे. तुम्ही पार्ले बिस्कीट अनेकदा खाल्ले असेल मात्र तुम्ही कधी पार्ले बिस्कीटपासून गुलाबजाम बनवून खाल्ला आहे का? होय. हे खरे आहे, आता तुम्ही पार्ले बिस्कीटपासून गुलाबजामदेखील बनवू शकता. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आज आपण हीच हटके रेसिपी पाहणार आहोत.
भारताच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध गोडाच्या पदार्थांमध्ये गुलाबजामचा समावेश येतो. तोंडात घालताच लगेच विरघळणारा हा पदार्थ चवीला फार अप्रतिम लागतो. साधारणतः हा गुलजाम मैद्यापासून बनवला जातो मात्र आज आपण याला पार्ले बिस्कीटपासून कसे तयार करावे, ते पाहणार आहोत.
या हटके रेसिपीचा @apalimavashi नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,आपल्या मावशीच्या हाताने बनवलेले बिस्कीट चे गुलाबजामुन असे लिहिण्यात आले आहे. अनेकांना ही रेसिपी फार आवडली आहे, तुम्हीही एकदा ही रेसिपी घरी नक्की करून पहा.






