Flax Seeds And Cinnamon For LDL Aka High Cholesterol: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कोलेस्ट्रॉल ही एक डोक्याला ताप असणारी समस्या बनली आहे. सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहेत. जेव्हा आपल्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते तेव्हा ते शिरांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. मग रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते, ज्यामुळे प्रथम रक्तदाब वाढतो आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांना जन्म देतो.
अशा परिस्थितीत, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे मार्ग शोधणे आणि जीवनशैली सुधारण्याबरोबरच आपण खाण्याच्या सवयीदेखील सुधारणे महत्वाचे आहे.त्यासाठी आपण नेहमीच्या खाण्यातील 2 पदार्थांची मदत घेऊ शकतो. हे पदार्थ नक्की कोणते आहेत ते आपण या लेखातून पाहूया (फोटो सौजन्य – iStock)
कोणते आहेत हे 2 पदार्थ
भारतातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, जर आपण दररोज स्वयंपाकघरात ठेवलेल्या दोन गोष्टींचे सेवन केले तर उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर समस्या सहज सुटू शकतात.मग प्रश्न पडतो की हे दोन पदार्थ नक्की कोणते आहेत? तर रोजच्या वापरतील हे पदार्थ तुम्हाला गंभीर समस्येपासून दूर ठेऊ शकतात.
[read_also content=”वयानुसार कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं https://www.navarashtra.com/lifestyle/what-should-my-cholesterol-level-be-age-539149.html”]
दालचिनीचे करा सेवन
आहारतज्ज्ञ आयुषी यांच्या मते, दालचिनीचे दररोज सेवन उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. याचा नक्की कसा वापर करावा याचीही त्यांनी इत्यंभूत माहिती दिली आहे.
तथापि, हे लक्षात ठेवा की या मसाल्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका कारण दालचिनीचा गुणधर्म हा उष्ण आहे, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसानदेखील होऊ शकते.
[read_also content=”कोलेस्ट्रॉल मधुमेहासाठी करा या पानांचा आहारात समावेश https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-suffering-from-cholesterol-diabetes-include-these-medicinal-leaves-in-your-diet-lifestyle-health-biet-food-nrsk-530559/”][read_also content=”कोलेस्ट्रॉल मधुमेहासाठी करा या पानांचा आहारात समावेश https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-suffering-from-cholesterol-diabetes-include-these-medicinal-leaves-in-your-diet-lifestyle-health-biet-food-nrsk-530559.html”]
अळशीच्या बियांचे नियमित सेवन
आळशीच्या बिया अनेक समस्या दूर करण्यासाठी ओळखल्या जात असल्या तरी, उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते अळशीच्या बिया या नसांमधील साचलेले कोलेस्ट्रॉल त्वरीत कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
यामुळे वाईट कोलेस्टेरॉल तर कमी होईलच, पण चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढेल. योग्य प्रमाणात नियमित याचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला याचा फायदा मिळू शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3307491/