Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावे. हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक आणि चमकदार ग्लो येण्यास मदत होते. जाणून घ्या चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2026 | 10:03 AM
तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! 'हे' घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! 'हे' घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

Follow Us
Follow Us:

कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर चेहरा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जातो. सतत येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावर जास्तीचे तेल जमा होण्यास सुरुवात होते. याशिवाय मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा खूप जास्त ऑईली दिसू लागते. कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावर धूळ, मातीचे थर साचून राहण्यास सुरुवात होते. हीच घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होते आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि मुरूम येतात. त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल नष्ट करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण त्याऐवजी घरगुती उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून राहील. चला तर जाणून घेऊया तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर

तेलकट त्वचेची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी:

वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहरा नियमित पाण्याने स्वच्छ धुवणे फार आवश्यक आहे. दिवसभरात दोन वेळा त्वचा फेसवॉशचा वापर करावा. जास्त वेळ फेसवॉशचा वापर करू नये. चेहरा सतत धुतल्यामुळे त्वचेवरील एक थर कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी जेलबेस फेसवॉशचा वापर करावा.

चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेसपॅक लावावा. वाटीमध्ये बेसन आणि चिमूटभर हळद घेऊन त्यात थोडस गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.हळदीचा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी होण्यास मदत होईल आणि डेड स्किन नष्ट होईल.

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा. मुलतानी मातीचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी टाकावे आणि पेस्ट तयार करावी. तयार केलेले मिश्रण ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावून १५ मिनिटं तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील तेल कमी होण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते? मग चेहऱ्यावर लावा ‘हा’ फेसपॅक, त्वचा राहील फ्रेश

उन्हाळामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटोमध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावरील तेल कमी कारण्यासोबतच टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी टोमॅटो मध्यभागी कापून त्यावर कॉफी टाकून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा खूप फ्रेश दिसेल. उन्हाळ्यात त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचा वापर करावा. काकडीमध्ये असलेले पाणी कायमच त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Forget the tension of oily skin forever doing this home remedy will reduce the tanning on the face and make the skin soft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

वातावरणातील बदलांमुळे केस खूप  पातळ झाले आहेत? मग टक्कल पडण्याआधी केसांवर लावा ‘या’ पदार्थाचे पाणी, केस होतील मजबूत
1

वातावरणातील बदलांमुळे केस खूप पातळ झाले आहेत? मग टक्कल पडण्याआधी केसांवर लावा ‘या’ पदार्थाचे पाणी, केस होतील मजबूत

पावसाळ्यात फॉलो करा सोपे स्किन केअर रुटीन! नियमित खा ‘हे’ गुणकारी पदार्थ, त्वचेवर टिकून राहील चमक
2

पावसाळ्यात फॉलो करा सोपे स्किन केअर रुटीन! नियमित खा ‘हे’ गुणकारी पदार्थ, त्वचेवर टिकून राहील चमक

हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ २ रुपयांची पावडर
3

हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ २ रुपयांची पावडर

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम
4

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.