केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर
केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. धूळ, माती, प्रदूषणामुळे केसांच्या गुणवत्तेवर परिणाम दिसून येतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे तर काहीवेळा केसांसंबधित गंभीर आजारांची लागण सुद्धा होते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांच्या समस्या आणखीनच वाढतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने केस पुन्हा एकदा होते तसेच होऊन जातात. सतत केलेल्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केसांमध्ये खूप जास्त कोरडेपणा वाढतो आणि केस झाडूसारखे निस्तेज होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महागडे शाम्पू, हेअर मास्क, हेअर सीरम लावले जातात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी केसांना बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी आवळा आणि कढीपत्त्याचे पानांचे हेल्दी ड्रिंक कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर हेल्दी ड्रिंक प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि केस गळणे थांबते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले आवळ्याचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने घालून थोडस पाणी घाला.त्यानंतर तयार केलेले सरबत गाळून घ्या. तयार केलेल्या आवळ्याच्या रसात कोमट पाणी घालून मिक्स करा आणि उपाशी पोटी सेवन करा. उपाशी पोटी आवळा आणि कढीपत्याच्या रसाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही आवळा आणि कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले फायबर आणि विटामिन सी केसांच्या वाढीसाठ मदत करतात.
महिनाभर नियमित आवळा आणि कढीपत्याच्या पानांचा रस प्यायल्यास केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळेल आणि केस गळती थांबवण्यास मदत होईल.आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा जास्त विटामिन सी असते, ज्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होतात. नियमित न चुकता महिनाभर आवळा आणि कढीपत्त्याच्या पानांचा रस प्यायल्यास सकारात्मक परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतील.






