Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार गुडघ्यांमध्ये वेदना होतात? औषधांचे सेवन करण्याआधी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, कायमचा मिळेल आराम

गुडघ्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. हाडांना तेलाने मसाज केल्यास हाडांमधील वेदनांपासून आराम मिळेल. जाणून घ्या गुडघे दुखीवरील घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2025 | 08:49 AM
वारंवार गुडघ्यांमध्ये वेदना होतात? औषधांचे सेवन करण्याआधी करून पहा 'हे' घरगुती उपाय

वारंवार गुडघ्यांमध्ये वेदना होतात? औषधांचे सेवन करण्याआधी करून पहा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शारीरिक थकवा, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात पोषणाचा अभाव निर्माण झाल्यानंतर हाडांमधील वेदना वाढू लागतात. पूर्वीच्या काळात वयाच्या ६० किंवा ७० वर्षानंतर हाडांमध्ये वेदना किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत होत्या. मात्र हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम तरुण वयातच आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देऊन शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. कमी हालचाल, जास्त बसून राहणे, वजन वाढणे आणि चुकीच्या सवयींमुळे तरुण वयातच हाडांमध्ये वेदना वाढत आहेत.(फोटो सौजन्य – istock)

तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा

गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदनांमुळे पायऱ्या उतरताना, चढताना, खाली वर करताना खूप जास्त वेदना होतात. या वेदना अतिशय तीव्र झाल्यानंतर चालणे सुद्धा कठीण होऊन जाते. सांध्यांमधी झीज झाल्यामुळे आणि घर्षणामुळे हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. गुडघ्यांवर दिलेला अतिरिक्त तणाव, विटामिन डी, विटामिन बी १२ ची कमतरता, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वेदना वाढू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळेल आणि गुडघे दुखी कमी होईल.

गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

दिवसांतून एकदा गरम पाण्याचा एक मिनिटं शेक घ्यावा. यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात. याशिवाय स्नायूंना आराम मिळतो, रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात. याशिवाय वारंवार गुडघ्यांना सूज येत असेल तर थंड पाण्याचा शेक घ्यावा. यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील आणि कायमचा आराम मिळेल. हल्ली गरम पाण्याचा वापर कोणीही करत नाही. पण आरोग्यासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी गरम पाणी अतिशय प्रभावी ठरते.

गुडघे दुखी वाढल्यानंतर तूप, खोबऱ्याचे तेल, तिळाचे तेल इत्यादी तेलांचा वापर करून गुडघ्यांना मालिश करावी. हातांना तेल लावून हलक्या हाताने गोलाकार दिशेत गुडघ्यांवर मालिश करा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. शरीराच्या कोणत्याही अवयवावर वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता.

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

दैनंदिन आहारात खाल्ले पौष्टिक पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे नियमित सेवन करावे. हळदीचे दूध, तीळ, बदाम, हिरव्या भाज्या आणि दूध इत्यादी पदार्थ आहारात समावेश केल्यास हाडांमधील कमी झालेले कॅल्शियम वाढेल आणि हाडांची झीज होणार नाही. याशिवाय नियमित हलकासा व्यायाम करावा, स्ट्रेचिंग करावा. ताडासन, त्रिकोणासन किंवा पवनमुक्तासन केल्यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

गुडघेदुखीची सामान्य कारणे कोणती आहेत?

डघ्याच्या आतील अस्थिबंधन किंवा कूर्चाला झालेली दुखापत.संधिवात किंवा बर्साइटिस (bursitis) सारख्या आजारांमुळे होणारी जळजळ.

गुडघेदुखीची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

गुडघ्यात वेदना आणि सूज.गुडघे स्थिर वाटत नाहीत किंवा हालचाल करताना अस्थिर वाटतात.गुडघे पूर्णपणे वाकवता किंवा सरळ करता येत नाहीत.सकाळच्या वेळी गुडघे जड वाटणे, पण साधारण अर्ध्या तासाच्या आत बरे वाटणे.

गुडघेदुखीसाठी प्राथमिक उपचार काय आहेत?

दुखणाऱ्या गुडघ्याला आराम द्या. दुखणाऱ्या भागावर बर्फाने शेक द्या. बँडेज किंवा पट्टीने गुडघा बांधा जेणेकरून सूज कमी होईल. गुडघा हृदयाच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Frequent pain in the knees try these home remedies before consuming medicines knee pain home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • strong bones

संबंधित बातम्या

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
1

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय
3

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
4

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.