Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादाची सर्वांना पडेल भुरळ; यंदा घरी बनवा रेड वेलवेट मोदक

Red Velvet Modak : बाप्पाच्या आगमनाची तयारी आकर्षक करूयात! नेहमीच्या मोदकांना द्या खास आणि सुंदर टच, घरी बनवा चविष्ट असे रेड वेलवेट मोदक. चवीबरोबरच पाहुण्यांचे लक्षही वेधतील हे मोदक.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2025 | 02:29 PM
Ganesh Chaturthi 2025 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादाची सर्वांना पडेल भुरळ; यंदा घरी बनवा रेड वेलवेट मोदक

Ganesh Chaturthi 2025 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादाची सर्वांना पडेल भुरळ; यंदा घरी बनवा रेड वेलवेट मोदक

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव म्हटलं की मोदक हा नैवेद्याचा अविभाज्य भाग आहे. मोदक हे मिष्टान्न गणपतीला फार प्रिय आहेत असे मानले जाते ज्यामुळे त्याच्या आगमनावेळी मोदकांचा खास प्रसाद अर्पण केला जातो. पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक तर आपण नेहमीच करतो. पण आजच्या काळात नवीन चव आणि आकर्षक प्रेझेंटेशनमुळे मुलं-बालगोपाळही मोदक खाण्यासाठी उत्सुक असतात. म्हणूनच या वेळेस आपण गणपतीसाठी पारंपरिकतेसोबत आधुनिकता एकत्र करून खास रेड व्हेलवेट मोदक तयार करूया.

साऊथ अभिनेता राम चरणपासून ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे चटकेदार रस्सम; जाणून घ्या रेसिपी

रेड वेलवेट केक तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा. हा फ्लेवर फक्त चावीलाच चांगला लागत नाही तर दिसायलाही फार आकर्षक वाटतो. रेड व्हेलवेटचा सुंदर लाल रंग आणि क्रीम चीज फिलिंगचा मऊ गोडवा हे मोदक एकदम रिच, सणासुदीला शोभतील असे बनवतात. आम्हाला खात्री आहे की तुम्ही बनवलेले हे हटके मोदक गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील. चला जाणून घेऊया याची रेसिपी!

साहित्य

बाहेरील आवरणासाठी (रेड व्हेलवेट मिश्रण)

  • मैदा – १ कप
  • कोको पावडर – २ टेबलस्पून
  • पिठीसाखर – १/२ कप
  • बटर – १/४ कप (रूम टेंपरेचरवर)
  • ताक – १/२ कप
  • बेकिंग पावडर – १/२ टीस्पून
  • बेकिंग सोडा – १/४ टीस्पून
  • लाल फूड कलर – १ टेबलस्पून
  • व्हॅनिला इसेन्स – १ टीस्पून
सारणासाठी (फिलिंग)
  • क्रीम चीज – १/२ कप
  • पिठीसाखर – १/४ कप
  • व्हॅनिला इसेन्स – काही थेंब
  • ड्रायफ्रूट चिरून – २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बटर आणि साखर फेटून घ्या. त्यात ताक, लाल फूड कलर, व्हॅनिला इसेन्स मिसळा.
  • दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या.
  • दोन्ही मिश्रण एकत्र करून हलके स्पॉंजी बॅटर तयार करा.
  • हे बॅटर कपकेक सारखं १५-२० मिनिटं बेक करून घ्या. बेक झाल्यावर थंड होऊ द्या आणि चुरे करून घ्या.
  • एका भांड्यात क्रीम चीज, पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स मिसळा. (हवे असल्यास बदाम, काजू, पिस्ता चिरून घाला).
  • आता रेड व्हेलवेटचे चुरे हाताने मळून घ्या आणि त्यात थोडे बटर किंवा कंडेन्स्ड मिल्क टाकून मऊ डो तयार करा.
  • मोदकाच्या साच्यात हे रेड व्हेलवेट मिश्रण भरून मध्ये क्रीम चीज फिलिंग घाला आणि मोदकाला आकार द्या.
  • सगळे मोदक साच्यातून काढून सुंदर प्लेटमध्ये सजवा.
  • फिलिंगमध्ये हवे असल्यास व्हाइट चॉकलेट घालून आणखी रिच टेस्ट आणता येते.
  • मोदक वरून थोडे ड्रायफ्रूट पावडर किंवा सिल्व्हर वर्कने सजवले तर अजून आकर्षक दिसतील.
  • असे हे रेड व्हेलवेट मोदक दिसायला मोहक, खायला भन्नाट आणि गणपती बाप्पांसाठी एकदम हटके प्रसाद ठरतील.
Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत

FAQs (संबंधित प्रश्न)

मोदक काय आहे?
मोदक हा गणपतीच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिकपणे तो तांदळाच्या पिठापासून आणि नारळ-गुळाच्या सरणाने तयार केला जातो पण आताच्या काळात अनेक वेगवेगळ्या प्रकारे मोदक तयार केले जाते. ज्यात मावा मोदक, चॉकलेट मोदक यांचा समावेश आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात मोदक का महत्त्वाचा असतो?
मोदक हा गणपतीचा आवडता गोड पदार्थ मानला जातो आणि तो त्यांना उत्सवाच्या वेळी प्रसाद म्हणून अर्पण केला जातो.

Web Title: Ganesh chaturthi 2025 special red velvet modak recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी
1

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा
2

बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’
3

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार
4

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.