(फोटो सौजन्य: Pinterest)
दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत रस्सम हा एक अत्यंत लोकप्रिय आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. भातासोबत खाल्ला जाणारा हा आंबटसर-तिखटसर रस्सा केवळ चवीलाच नाही तर पचनासही उपयुक्त मानला जातो. त्यामध्ये चिंच, टोमॅटो, मिरी, जिरे, हळद, करीपत्ता यांसारखे मसाले व साहित्य वापरले जातात, ज्यामुळे त्याची चव अजूनच खास लागते. गरमागरम भातावर रस्सम ओतून, त्यावर थोडे तूप घालून खाल्ल्यास जेवणाचा आस्वाद दुप्पट होतो.
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात
दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये रस्सम रोजच्या जेवणात आवर्जून बनवला जातो. हलका, झटपट आणि पोटाला सुखावणारा हा पदार्थ पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात खाल्ला तर शरीराला उबदार ठेवण्यासही मदत होते. अनेक अभिनेत्यांनी आपल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे की त्यांना रस्सम खायला फार आवडतो. अशात सर्वांच्या आवडीच्या या डिशमध्ये नक्की काय आहे ते तुम्ही एकदा तरी घरी बनवून पाहायलाच हवे. चला तर मग जाणून घेऊया रस्समची एक भन्नाट आणि सोपी रेसिपी.
साहित्य
कृती
रसम म्हणजे काय?
रसम हा एक दक्षिण भारतीय रस्सा आहे, जो चिंच, टोमॅटो, मसाले वापरून बनवला जातो आणि गरमा गरम भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह केला जातो.
रसमचे आरोग्याला फायदे काय आहेत?
रसममध्ये असलेले मसाले आणि औषधी वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि सर्दी, खोकला यांसारख्या आजारांशी लढायला मदत करतात.