
Hantavirus outbreak Number of patients rises to 11 WHO imposes strict restrictions for 42 days
Hantavirus outbreak 2026 : जग अजून कोरोनाच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नसतानाच, आता ‘हंताव्हायरस’ (Hantavirus) नावाच्या एका जुन्या पण अत्यंत प्राणघातक विषाणूने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली आहे. एका आलिशान क्रूझ जहाजावर या विषाणूचा उद्रेक झाला असून, पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांवर आता मृत्यूचे सावट पसरले आहे. अर्जेंटिनापासून अंटार्क्टिकाच्या दिशेने निघालेल्या या जहाजावर आतापर्यंत ११ जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, यातील तीन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यामुळे जागतिक आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
डच मोहीम क्रूझ जहाज ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) हे १ एप्रिल रोजी अर्जेंटिनाच्या उशुआइया बंदरातून अंटार्क्टिकाच्या रोमांचक सफरीसाठी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान काही प्रवाशांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय तपासणीअंती हे हंताव्हायरसचे रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून हे जहाज तातडीने स्पेनच्या टेनेरिफ येथे थांबवण्यात आले. सध्या या जहाजावरील सर्व प्रवाशांना खाली उतरवून विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
हे देखील वाचा : National Fruit Cocktail Day: उन्हाळ्याच्या लाहीलाहीमध्ये शरीराला द्या ताजेपणाचा डोस; चव आणि आरोग्याचा हा अनोखा मेळावा
हंताव्हायरसचा ‘इन्क्युबेशन पिरीयड’ (सुप्त काळ) खूप जास्त असल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) विलगीकरणाच्या नियमात मोठी वाढ केली आहे. सामान्यतः १४ दिवसांचे विलगीकरण असते, मात्र हंताव्हायरससाठी पूर्ण ४२ दिवसांचे कडक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. या काळात कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी बाहेर पडू शकणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण असले, तरी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलणे अनिवार्य असल्याचे WHO ने स्पष्ट केले आहे.
Polymarket traders are now pricing a 9% chance of a hantavirus epidemic in 2026 one trader just bet $12,000 on Yes. Potential profit: ~$120k 9% probability isn’t small. It’s far from impossible. after covid traders have become much more sensitive to early outbreak signals.… pic.twitter.com/o8Hhps11zK — Alekzz (@AIexey_Stark) May 11, 2026
credit – social media and Twitter
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हंताव्हायरस हा कोरोनाव्हायरसपेक्षा खूपच जास्त धोकादायक आहे. कोरोनाचा मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी होता, मात्र हंताव्हायरसचा मृत्यूदर २० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. याचा अर्थ, संसर्ग झालेल्या दर १० व्यक्तींमागे किमान ४ व्यक्तींचा मृत्यू होण्याची भीती असते. हा विषाणू प्रामुख्याने उंदीर आणि इतर कुरतडणाऱ्या प्राण्यांमार्फत पसरतो. मात्र, या जहाजावर आढळलेला ‘अँडीज स्ट्रेन’ (Andes strain) हा थेट मानवाकडून मानवाकडे पसरू शकतो, ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
हे देखील वाचा : Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा
हंताव्हायरसची लागण झाल्यावर सुरुवातीला तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. जसजसा संसर्ग वाढतो, तसतसे फुफ्फुसांत पाणी भरून श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. सध्या या आजारावर कोणतीही अधिकृत लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे “सावधगिरी हाच एकमेव उपाय” ठरत आहे. वैयक्तिक स्वच्छता पाळणे आणि संशयित रुग्णांपासून लांब राहणे, हेच सध्या आपल्या हातात आहे.