तुम्ही सकाळी गाढ झोपेतून उठता आणि मोबाईल हातात घेता आणि पाहता तर काय? तुमच्या गर्लफ्रेंडचा Whatsapp DP दिसत नाही आहे. तुम्ही शुभ सकाळ करत आहात परंतु एक टीक येत आहे. जर या गोष्टी घडत आहेत तर तुमची प्रेयसी तुमच्यावर इतकी रुसली आहे की तिने तुम्हाला सरळ ब्लॉकच केले आहे. यात अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला वाटेल की तिने ब्लॉक केले आहे, याचा अर्थ तुमची चुकी आहे. परंतु, अनेक असे अनेक कारणे असू शकतात की ज्यामुळे तिने तुम्हाला ब्लॉक केले आहे. प्रत्येक कारणात तुमची चूक नाही. जर नसेल तरी काही प्रयत्न केले पाहिजेत. अनेक वेळा प्रयत्न करूनही समोरील व्यक्ती ऐकत नसेल तर नात्याचा विचार करण्याची वेळ आली असते. चला तर मग जाणून घेऊयात ‘ही’ कारणे:
नात्यामधे भांडणे मुख्यतः गैरसमज असल्यामुळे होतात. आपण बोलतो एक आणि समोरील व्यक्ती अर्थ घेतो एक! अशामुळे होणाऱ्या भांडणांना काहीच अर्थ नसतो. त्यामुळे नात्यात सामंज्यसपणा असावा. असे नाही की गैरसमज आहे तर नात्यात सामंज्यसपणा नाही. गैरसमज प्रत्येक नात्यात होतात पण त्यावर चर्चा करून मार्ग काढणे हे खऱ्या प्रेमाची निशाणी आहे. कधी कधी तुमचे जास्त उतू जाणारे प्रेम तुमच्या प्रेमात अडथळा ठरू शकतो. कुणीही येऊन आपल्याला टोकाटोक करत असेल तर ते कुणालाही नाही आवडणार, अगदी तुम्हालाही नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचे स्वतंत्र्य आहे. तर ज्याला ज्याची-त्याची स्पेस देणेही महत्वाचे आहे. भले तुम्ही दोघे नात्यात असाल पण तुमच्या दोघांचे आयुष्य वेगवेगळे आहेत, ही लक्षात घेण्याची बाब आहे. जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला स्वातंत्र्य आणि स्पेस देत नसाल तर ती तुम्हाला ब्लॉक करण्याची शक्यता असते किंवा तिचा तुमच्यात असणारा रस कमी होऊ शकतो.
कधी कधी प्रेयसीच्या आयुष्यात कुणी नवीन आले तर तुमच्या नात्यात दरार येऊ शकते. शक्यतो ही फूट सहजा येत नाही पण आली तर समजून जा नात्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण अशावेळी एक तर तुमची निवड चुकली आहे किंवा तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीच नव्हते. कधी कधी तुमची चूक जड जाईल. तुम्ही प्रेम करता तर तुम्हाला असुरक्षितता असणे यात काही गैर नाही. परंतु, त्या गोष्टी तुम्ही तिला दहावेळा विचाराल तर ती तुम्हाला नक्कीच कंटाळून जाईल. ही काही कारणे आहेत, ज्यांमुले तुमची GF तुम्हाला Block करून बसली असू शकते. कारण ओळख आणि त्यानुसार Action घ्या.