
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात?
कोणत्या कारणांमुळे महिलांच्या शरीरातील गर्भाशय काढले जाते?
गर्भाशय काढल्यानंतर शरीरात होणारे बदल?
गर्भाशय काढण्याचे दुष्परिणाम?
महिलांच्या शरीरातील अतिमहत्वाच्या अवयव म्हणजे गर्भाशय. मासिक पाळी, गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी शरीरातील गर्भाशय कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. पण वाढत्या वयात महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. बऱ्याचदा महिला कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. नातेसंबंध, घरातील कामे, कुटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी कामांमध्ये महिला कायमच व्यस्थ असतात. पण यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे अतिशय लहान आजार मोठे स्वरूप घेतात आणि आरोग्य बिघडून टाकतात. जास्त रक्तस्त्राव, गर्भाशयात गाठ (फायब्रॉइड), एंडोमेट्रियोसिस किंवा कॅन्सर इत्यादी कारणामुळे गर्भाशय काढून टाकवे लागते. शरीरातील अतिमहत्वाच्या भाग काढून टाकल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभरात न चुकता करा ३ लीटर पाण्याचे सेवन! शरीराला होतील अद्भुत फायदे, महिनाभरात दिसून येईल बदल
गर्भाशय काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत हिस्टेरेक्टॉमी असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय कमकुवत होऊन जातात. शरीरात बदल झाल्यानंतर चिडचिड किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरातील गर्भाशय काढून टाकल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? यामागे नेमकी काय कारणे आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरातील गर्भाशय काढल्यानंतर हार्मोन्सची वाढ पूर्णपणे थांबते, ज्यामुळे शरीरात खूप जास्त उष्णता जाणवते. यामुळे महिलांना अचानक कोणत्याही वेळी गरम झाल्यासारखे वाटते. याशिवाय रात्रीच्या वेळेस घाम येणे, चिडचिड होणे, थकवा येणे आणि झोप न येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे त्वचा खरखरीत होणे, केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
Ans: गर्भाशय काढल्यानंतर महिला गर्भवती राहू शकत नाही.
Ans: रिकव्हरीचा वेळ शस्त्रक्रियेच्या प्रकारावर (पोटाची, योनीमार्गातील किंवा लॅपरोस्कोपिक) अवलंबून असतो.
Ans: गर्भाशय काढल्याने थेट वजन वाढत नाही. परंतु, हार्मोनल बदलांमुळे किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या आरामामुळे जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे वजन वाढू शकते.