Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावरील हेल्थ ट्रेंड्सचे कर्करोगाला आमंत्रण! डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएटमुळे नुकसान; तज्ज्ञांचा इशारा

सोशल मीडियावर नवेनवे हेल्थ ट्रेंड्स येताना दिसतात आणि घरच्या घरी उपाय करता येतील असं समजून अनेक जण ते फॉलोही करतात. मात्र त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 03, 2025 | 02:31 PM
इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करून कोणत्याही गोष्टी फॉलो करणे योग्य नाही (फोटो सौजन्य - iStock)

इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करून कोणत्याही गोष्टी फॉलो करणे योग्य नाही (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावरील वाढता हेल्थ ट्रेंड 
  • कॅन्सरसारखे आजार वाढले
  • आरोग्यावरील नकारात्मक परिणाम घ्या जाणून 
सोशल मीडियावर सध्या ‘हेल्थ ट्रेंड्स’ची क्रेझ वाढत असून, अनेकजण डिटॉक्स ड्रिंक, क्रॅश डाएट,फॅट बर्निंग स्मूदी सारख्या उपायांचा अवलंब करु लागले आहेत. आपण फिट आणि तरुण दिसावे या नीदात केले जाणारे ह प्रयोग  शरीराचे नुकसान करतात. अशा फॅड्समुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो असा इशारा कर्करोग तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते अत्यंत कमी कॅलरीचे डाएट किंवा डिटॉक्स ड्रिंक्सचा अतिरेक केल्यास शरीरातील नैसर्गिक पोषकता खालावते. अशा आहारामुळे यकृत व मूत्रपिंडांवर ताण येतो. परिणामी शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जो पेशींना हानी पोहोचवून कर्करोगाची शक्यता वाढवतो.

किडनी लिव्हर होईल डिटॉक्स! उपाशी पोटी नियमित करा पाण्याचे सेवन, शरीराला होतील कमालीचे फायदे

आंधळेपणाने विश्वास ठेवणं टाळा 

डिटॉक्सच्या नावाखाली शरीराला उपाशी ठेवणे किंवा फक्त ज्यूसवर, सॅलड खाऊन जगणे हे धोकादायक आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि भूक वेगवेगळी असते. त्यामुळे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यावर अंधपणे विश्वास ठेवू नका.

सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड्समुळे अनेक तरुण आपली स्थिती न पाहता स्वतःहूनच आहारात बदल करतात. मात्र हे बदल वैद्यकीय सल्ल्याशिवाय केले गेल्यास हार्मोनल समस्या, थकवा आणि त्वचेच्या विकारास तसेच गंभीर आजारास कारणीभूत ठरतात. अत्यंत कमी कॅलरीज असलेले  क्रॅश डाएट शरीराला ‘स्टार्वेशन मोड’मध्ये ढकलते. यामुळे पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जो दीर्घकाळात कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. केवळ ज्यूस किंवा डिटॉक्स ड्रिंक्सवर जगणे प्रोटीन, फॅट, आयर्न, B12, फायबर यांची तीव्र कमतरता निर्माण करते आणि यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. 

बाजारातील डिटॉक्स ड्रिंक ठरते जीवघेणे

बाजारात मिळणाऱ्या  काही डिटॉक्स ड्रिंक्स, हर्बल पावडर, स्लिमिंग टीजमध्ये धातू (lead, arsenic),कृत्रिम रसायनं, हार्मोन्सवर परिणाम करणारे घटक आढळतात व हे घटक शरीरात साठून थायरॉईड, स्तन, पचनसंस्थेचा कर्करोग वाढवू शकतात.

दररोजच्या डिटॉक्स ड्रिंक्ससाठी काही उत्तम पर्याय; प्या पेय, निश्चित स्वस्थ राहण्याचा ध्येय

काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. अभिषेक पुरकायस्थ, टोमोथेरपी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर सांगतात की,सोशल मीडियावर चुकीचे आणि असुरक्षित हेल्थ ट्रेंड्स फॉलो केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांची लक्षणे दुर्लक्षित केली जाऊ शकतात. योग्य वैद्यकीय सल्ला घेण्यास उशीर झाल्यामुळे आजार गंभीर रुप धारण करु शकतो. अनेक सोशल मीडिया ट्रेंड्स वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नसतात. असे ट्रेंड्स फॉलो केल्यामुळे कर्करोगग्रस्तांसाठी हानिकारक ठरू शकतात, कारण ते एखाद्याला पारंपरिक वैद्यकीय उपचारांपासून दूर राहण्यास प्रवृत्त करतात.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॅास्पीटलचे जनरल फिजीशियन डॉ. आदित्य देशमुख सांगतात की, सोशल मिडियावरील डिटॅाक्स ड्रिंक्सला बळी पडू नका आणि तुम्हाला जर खरोखरच डाएट करायचे असेल किंवा डिटॅाक्स करायचे असेल तर आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्याने आवश्यक त्या आरोग्य तपासण्या करुन घ्या आणि मगच योग्य तो पर्याय निवडा. आपण जर योग्य

त्या तपासण्या केल्या नाहीत तर आपल्या शरीराला कशाची कमतरता आहे, लक्षणं काय आहेत हे कळणार नाही. या साऱ्याचा विचार करुन मगच आपल्याला डिटॅाक्स ड्रिॅक किॅवा डाएटची गरज आहे का ते ठरवणे योग्य राहिल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होईल असेही डॉ देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Health trends on social media invite cancer detox drinks crash diets cause harm experts warn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • detox drinks
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
1

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय
2

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Ex सोबतची मैत्री पुन्हा देईल का दगा? ‘मैत्रीचा हात’ पुढे करण्यापूर्वी ‘या’ ४ गोष्टींचा नक्की विचार करा
3

Ex सोबतची मैत्री पुन्हा देईल का दगा? ‘मैत्रीचा हात’ पुढे करण्यापूर्वी ‘या’ ४ गोष्टींचा नक्की विचार करा

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं
4

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.