शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काही खानपान आहेत. ज्यांचे सेवन केल्यास आपल्या शरीराचे डिटॉक्स होण्यास मदत मिळते. काही असे पेय आहेत, ज्यांचे सेवन केल्यास शरीराला डिटॉक्स करण्यात फायदा होतो. शरीराला स्वच्छ करण्यासाठी हे पेय फार फायद्याचे ठरते. लिंबाच्या रसासोबत मिश्रण केलेले हे पेय शरीअरची डिटॉक्समेन्टमध्ये फायद्याचे ठरतात.
'या' पेयांचे करा सेवन, वाढेल शरीराची डिटॉक्स पावर. (फोटो सौजन्य - Social Media)

लिंबू पाणी + काकडी = त्वचेसाठी लाभदायक लिंबू आणि काकडी यांचे मिश्रण त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते, कारण दोन्ही घटकांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

लिंबू पाणी + पुदीना = पचन सुधारण्यासाठी पुदीन्याचे गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, तसेच गॅस व पोटाच्या तक्रारी दूर करण्यासही हे प्रभावी ठरते.

लिंबू पाणी + आले = वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि आले एकत्र घेतल्याने शरीरातील चरबी जळण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास सहाय्य होते.

लिंबू पाणी + लसूण = इम्युनिटी मजबूत करण्यासाठी लिंबू आणि लसूण शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात आणि रोगप्रतिकारक यंत्रणा सुदृढ ठेवतात.

लिंबू पाणी + मध = शरीर शुद्ध करण्यासाठी मध आणि लिंबू यांचे मिश्रण शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते.






