Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: कर्करोगावरील उपचार महागणार? केमोथेरपीच्या औषधांच्या किमतीत १० ते ५० टक्के वाढ

केमोथेरपी सत्राचा खर्च दोन हजार ते ३ हजार रुपयांनी वाढू शकतो. बहुतांश रुग्णांना ४ ते ६ किंवा त्याहून अधिक केमो सायकल्स घ्याव्या लागतात. त्यामुळे एकूण उपचार खर्चात हजारो रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे. उपचार महाग झाल्यामुळे रुग्णांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 11:30 AM
Health Update: कर्करोगावरील उपचार महागणार? केमोथेरपीच्या औषधांच्या किमतीत १० ते ५० टक्के वाढ

Health Update: कर्करोगावरील उपचार महागणार? केमोथेरपीच्या औषधांच्या किमतीत १० ते ५० टक्के वाढ

Follow Us
Follow Us:

अमेरिका-इराण संघर्ष म्हणजे केवळ कच्च्या तेलाचा पुरवठा इतपत मर्यादित न राहता आरोग्य, आजार, उपचार असा व्यापक परिणाम झाला असल्याचे वारंवार समोर येत आहे, आखाती युद्धाच्या परिणामामुळे कर्करोग रुग्णांचे उपचार दर वाढणार आहेत. कारण कर्करोग उपचारातील महत्वाची केमोथेरपी असून यातील औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. कर्करोग उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सिस्प्लॅटिन आणि काबर्बोप्लॅटिन या औषधांच्या किमती वाढविण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिल्याने काही औषधांच्या दरात १० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता फार्मा इंडस्ट्री आणि तज्ज्ञ ही सांगत आहेत.(फोटो सौजन्य – istock)

हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? वयाच्या चाळिशीनंतर आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आर्थरायटिस टाळण्यासाठी उपाय

दरम्यान, औषध उत्पादक कंपन्यांनी पुन्हा उत्पादन सुरू केले असले तरी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान एक महिना लागू शकतो, असे फार्मा साखळीतील प्रत्ययदर्शी सांगतात. त्यामुळे कर्करोग उपचारांतील अत्यावश्यक आणि तुलनेने स्वस्त मानल्या जाणाऱ्या सिस्प्लॅटिन व कार्बोप्लॅटिन औषधांच्या तुटवड्यामुळे देशभरातील हजारो रुग्णांवर आर्थिक व वैद्यकीय परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक केमो आवर्तन २ ते ३ हजार रुपयांनी महाग

एका केमोथेरपी सत्राचा खर्च दोन हजार ते ३ हजार रुपयांनी वाढू शकतो. बहुतांश रुग्णांना ४ ते ६ किंवा त्याहून अधिक केमो सायकल्स घ्याव्या लागतात. त्यामुळे एकूण उपचार खर्चात हजारो रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे.या स्थितीचा फटका मुंबईतील रुग्णालयांनाही पडत असून मुंबईतील कामा व अल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, सिस्प्लॅटिन, कार्बोप्लॅटिन आणि ऑक्सालिप्लॅटिन या प्लॅटिनम-आधारित औषधांच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

त्यामुळे डॉक्टरांना काही रुग्णांसाठी नेहमीची उपचार पद्धत बदलावी लागत असल्याचे सांगितले. ही औषधे फुफ्फुस, तोंड, गर्भाशय मुख (सायकल), अंडाशय, स्तन, वृषण आणि पित्ताशयाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. अनेक कर्करोगासाठी ही औषधे ‘फर्स्ट लाईन थेरपी ‘चा महत्वाचा भाग मानली जात असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

आयुष्यात कधीच होणार नाही मधुमेह! रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

उत्पादन घटण्याचे नेमके कारण काय ?

सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन ही औषधे राष्ट्रीय अत्यावश्यक औषध यादी अंतर्गत किंमत नियंत्रणाखाली आहेत. मात्र कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यानंतरही उत्पादक कंपन्यांना दर वाढविता येत नव्हते. त्यामुळे उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यांच्यातील तफावत वाढली व अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले किंवा थांबवले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Health update will cancer treatment become more expensive prices of chemotherapy drugs to rise by 10 percent to 50 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Cancer Awareness
  • Cancer prevention
  • Health Updates

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार
4

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.