Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Ragi Dhokla Recipe : सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. हा नाश्ता हेल्दी असेल तर आरोग्यालाही याचा फायदा मिळतो. चला जाणून घेऊया नाचणीच्या पिठापासून ढोकळा तयार करण्याची पद्धत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 10:23 AM
Recipe : हेल्दी अन् टेस्टी... नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Recipe : हेल्दी अन् टेस्टी... नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • नाचणीचा ढोकळा खाल्ला आहे का?
  • हेल्दी आणि टेस्टी असा सकाळचा नाश्ता.
  • चला नोट करुया रेसिपी.
सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचा मानला जातो. म्हणूनच नाश्ता कधीही स्किप करु नये. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर उर्जावान ठेवण्यास मदत करत असतो. आरोग्याच्या समस्या पाहता अनेकजण आता हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याकडे वळले आहेत. म्हणजेच नाश्ता पाैष्टिक तर असावा पण त्याची चवही अप्रतिम असावी. तुम्हीही हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याच्या जर शोधात असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी कामाची ठरु शकते. वजन कमी करताना आपल्या डाएटमध्येही तुम्ही याचा समावेश करु शकता.

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे नाचणीच्या पिठाचा ढोकळा. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. आजवर तुम्ही बेसनाच्या पिठाचा साॅफ्ट ढोकळा खाल्ला असेल पण याचेच हेल्दी व्हर्जन नाचणीच्या पिठाचा ढोकळा देखील सकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. हा ढोकळा फक्त पाैष्टिकच नाही तर याची चवीलाही छान लागतो. चला तर मग नाचणीच्या पिठाचा मऊ, जाळीदार ढोकळा कसा तयार करायचा ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

साहित्य

  • नाचणीचे पीठ ९० ग्रॅम
  • रवा १२० ग्रॅम
  • मीठ १ चमचा
  • दही १ कप
  • आले-मिरची पेस्ट १ चमचा
  • पिठीसाखर १ मोठा चमचा
  • तेल ३ मोठे चमचे
  • इनो १.५ चमचा
  • मोहरी अर्धा चमचा
  • दोन हिरव्या मिरच्या
  • तीळ १ चमचा
  • कोथिंबीर
Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

कृती

  • नाचणीचा ढोकळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात नाचणीचे पीठ, रवा आणि दही एकत्र करुन घ्या.
  • आता यात दीड कप पानी टाकून मिश्रण छान ढवळून घ्या, यात गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • आता यात मीठ, आले-मिरची पेस्ट, पिठीसाखर आणि एक चमचा तेल घालून तयार बॅटर २० मिनिटे झाकून ठेवा.
  • आता एका भांड्याला चारही बाजूने तेलाने ग्रीस करा.
  • तयार नाचणीच्या पिठात इनो घाला आणि पुन्हा एकदा मिश्रण चांगलं ढवळा.
  • आता तयार बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात ओता.
  • एका मोठ्या भांड्यात किंवा इडलीच्या साच्यात पाणी घालून गॅसवर ठेवा आणि पाणी उकळले की यात बॅटर टाकलेले भांडे ठेवा.
  • वरुन झाकण लावा आणि २० ते २५ मिनिटे मध्यम आचेवर मिश्रणाला छान शिजू द्या.
  • २० मिनिटांनी झाकण उघडून चाकू किंवा काटा चमच्याने साहाय्याने ढोकळा शिजला की नाही ते तपासा.
  • चाकूला कच्चे पिठ लागले की समजून जा, ढोकळ्याला आणखी काही मिनिटे शिजण्याची गरज आहे. तथापि पिठ लागले नाही तर तुमचा ढोकळा योग्य रित्या शिजला आहे.
  • ढोकळा शिजला की, गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर ढोकळा एका प्लेटीत काढून घ्या.
  • आता एका कढईत तेल गरम करुन यात मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, तीळ घालून फोडणी द्या. एका
  • मनिटांनंतर यात थोडं पाणी आणि साखर घाला आणि मग साखर वितळली की गॅस बंद करा.
  • शेवटी तयार फोडणी प्लेटीत काढलेल्या ढोकळ्यावर घाला आणि याचे चाैकोनी तुकडे करा आणि नाचणीचा ढोकळा खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Healthy and tasty spongy ragi dhokla recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
1

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
2

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.