Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण

Avoid These Mistakes While Dieting: डाएटिंग करुन आणि हेल्दी पदार्थ खाऊनही वजन कमी होत नाही. आजच टाळा या गोष्टी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 07:07 PM
Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण
Follow Us
Follow Us:
  • डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये
  • जाणून घ्या यामागचे कारण
  • अशी घ्या काळजी
आजकाल फिट आणि निरोगी राहण्यासाठी अनेकजण हेल्दी डाएट फॉलो करतात. साखर, तेलकट पदार्थ आणि जंक फूड टाळूनही काही लोकांचे वजन मात्र कमी होण्याऐवजी वाढतं. त्यामुळे ‘इतका हेल्दी आहार घेऊनही वजन का वाढत आहे?’ असा प्रश्न अनेकांना पडतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते, फक्त हेल्दी पदार्थ खाणे पुरेसे नसते, तर त्यामागील प्रमाण, लाइफस्टाइल आणि शरीराच्या गरजांकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते. काही छोट्या चुका वजन वाढण्याचे कारण असू शकतात. तुम्हीही डाएटिंग करता, हेल्दी आहार घेता पण वजन कमी होत नाही, मग या चुका नक्की टाळा, जाणून घ्या.

Vitamin B12: सतत थकवा जाणवतोय? असू शकतं Vitamin B12 च्या कमतरतेचे संकेत; जाणून घ्या लक्षणे

हेल्दी पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

अनेक लोक हेल्दी पदार्थ असल्यामुळे ते जास्त प्रमाणात खातात. ड्रायफ्रूट्स, पीनट बटर, स्मूदी, ओट्स किंवा ग्रॅनोला हे आरोग्यासाठी चांगले असले तरी त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते.

कॅलरीजकडे दुर्लक्ष

फिटनेस डाएटमध्ये सॉसेस, ड्रेसिंग्स, फ्लेवर्ड योगर्ट, हेल्दी स्नॅक्स किंवा पॅकेज्ड ज्यूस यांचा समावेश असतो. मात्र, या पदार्थांमध्ये साखर आणि अतिरिक्त कॅलरीज लपलेल्या असू शकतात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते.

पुरेशी शारीरिक हालचाल नसणे

फक्त डाएट करून वजन नियंत्रणात राहत नाही. नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचालही आवश्यक असते. दिवसभर बसून काम करणे, चालणे कमी होणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत.

अपुरी झोप आणि तणाव

झोपेचा अभाव आणि सततचा तणाव हे देखील वजन वाढण्यामागील मोठे कारण ठरू शकतात. कमी झोपेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि भूक अधिक लागते. तणावामुळे अनेकजण वारंवार खाण्याकडे वळतात.

प्रोटीन आणि फायबरची कमतरता

हेल्दी डाएटमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर नसल्यास सतत भूक लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लोक वारंवार स्नॅक्स खातात आणि कॅलरी इनटेक वाढतो.

“हेल्दी” लेबलवर अंधविश्वास

बाजारात मिळणाऱ्या अनेक पदार्थांवर “लो फॅट”, “शुगर फ्री” किंवा “हेल्दी” असे लेबल असते. मात्र, हे पदार्थ पूर्णपणे आरोग्यदायी असतीलच असे नाही. त्यामुळे कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्यावरील न्यूट्रिशन लेबल वाचणे आवश्यक आहे.

वजन नियंत्रणासाठी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण या सर्व गोष्टी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त हेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि अॅक्टिव्ह लाइफस्टाइल यावर भर देणे गरजेचे आहे. जर सतत हेल्दी डाएट घेत असूनही वजन वाढत असेल, तर आहारतज्ज्ञ किंवा फिटनेस एक्सपर्टचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Relationship Tips: नातं तुटण्याआधी दिसतात ‘हे’ रेड फ्लॅग्स! टॉक्सिक रिलेशनशिपची सुरुवात ओळखा, वेळेत वाचवा नातं

Web Title: Healthy diet mistakes causing weight gain weight loss tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Healthy Foods
  • lifestyle news in marathi
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे
1

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ
2

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम
3

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.