Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Disease: धावपळीच्या आयुष्यात हृदय थकतंय? ‘या’ संकेतांकडे करु नका दुर्लक्ष, जिवावर बेतू शकतं

Heart Disease Symptoms Early Symptoms: शरीररामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे किंवा सतत अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतील तर हे हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 07:32 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • शरीरात ‘हे’ बदल दिसताच वेळीच व्हा सावध
  • असू शकतो हृदयविकाराचा धोका
  • जाणून घ्या लक्षणे
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि अनियमित दिनचर्या यामुळे अनेकांना कमी वयातही हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत. मात्र, अनेक वेळा शरीर आधीच काही संकेत देत असते, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराची काही सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखली तर गंभीर धोका टाळता येऊ शकतो. ही लक्षणे कोणती, जाणून घ्या.

Sleeping Tips: तुम्हालाही रात्री झोपताना घोरण्याची सवय आहे का? मग ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे

छातीत वेदना, जडपणा किंवा दडपण जाणवणे हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. काही वेळा ही वेदना हात, खांदा, मान किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते. विशेषतः चालताना, जिने चढताना किंवा ताण आल्यावर अशी समस्या वाढत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

श्वास घेण्यास त्रास होणे

थोडे चालल्यावर किंवा साधे काम केल्यानंतरही धाप लागणे हे हृदय कमजोर होण्याचे संकेत असू शकतात. हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचू लागतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

सतत थकवा जाणवणे

पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर ते हृदयाशी संबंधित समस्या असू शकते. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण अधिक दिसून येते. शरीराला पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न झाल्यास अशक्तपणा आणि थकवा वाढतो.

पायांमध्ये सूज येणे

पाय, घोटे किंवा टाचांमध्ये सतत सूज येणे हेही हृदयविकाराचे संकेत असू शकतात. हृदय व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरात द्रव साचू लागतो आणि त्यामुळे सूज निर्माण होते.

अनियमित हृदयाचे ठोके

हृदयाचे ठोके अचानक खूप वेगाने किंवा अनियमित होणे हे गंभीर लक्षण असू शकते. चक्कर येणे, घाम येणे किंवा बेचैनीसोबत ही समस्या जाणवत असेल तर त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney Disease: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

Web Title: Heart disease symptoms early warning signs marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • heart attack
  • heart care tips
  • Heart Disease
  • Symptoms

संबंधित बातम्या

उच्च रक्तदाब, मधुमेह अन् लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
1

उच्च रक्तदाब, मधुमेह अन् लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट
2

भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार
3

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

सततचा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास? दुर्लक्ष करू नका; हृदयविकाराचे असू शकतात संकेत
4

सततचा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास? दुर्लक्ष करू नका; हृदयविकाराचे असू शकतात संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.