Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार
जर तुम्हाला घोरणे टाळायचे असेल, तर नेहमी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा, एका कुशीवर झोपल्यामुळे श्वसनमार्ग पूर्णपणे मोकळा राहण्यास मदत होते आणि व्यक्ती कमी घोरतो.
अधिक वजनामुळे मानेभोवती चरबी वाढते आणि श्वसनमार्गावर दबाव येतो. त्यामुळे घोरण्याची समस्या गंभीर होऊ शकते. यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन करा.
सर्दी किंवा अॅलर्जीमुळे नाक बंद असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो आणि घोरणे वाढू शकते. त्यामुळे नाक स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.
झोपताना एका अतिरिक्त उशीच्या साहाय्याने आपले डोके सुमारे ४ इंच उंच करा. यामुळे श्वासमार्गात होणारा अडथळा टळतो.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या, कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे नाक आणि घशातील कफ चिकट होऊन अडथळे निर्माण होऊ शकतात.
Papaya Health Facts: कच्ची पपई खाणे फायदेशीर की हानिकारक? आरोग्यावर काय परिणाम होतो?






