Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Men’s Health: चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांसाठी धोक्याची घंटा! ‘या’ गंभीर आजाराचा वाढतो धोका; अशी घ्या काळजी

Health Tips For Men After 40: ४० वर्षांनंतर पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढू लागतो, त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि रोजचा व्यायाम यांचा अवलंब केल्यास हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवता येऊ शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 05:57 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांसाठी धोक्याची घंटा
  • ‘या’ गंभीर आजाराचा वाढतो धोका
  • अशी घ्या काळजी
आजकाल हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. अगदी तरुण लोकांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार पाचपैकी जवळपास चार मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि पॅरालिसिसिमुळे होतात. कोणत्याही वयात आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, परंतु जर तुमचे वय ४० किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. विशेषतः ४० वर्षांनंतर पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. त्यामुळे या वयात हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. नियमित तपासणी, संतुलित आहार आणि शारीरिक हालचाल यामुळे हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवता येऊ शकते.

Sleepiness After Eating Rice: भात खाल्ल्यानंतर झोप का येते? जाणून घ्या यामागचं कारण

४० वर्षांनंतर हृदयाची काळजी का महत्त्वाची?

वय वाढल्यानंतर शरीरातील चयापचय प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिजम रेट मंदावतो. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य सवयी अंगीकारणे गरजेचे ठरते.

रक्तदाबाची नियमित तपासणी करा

उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा जाणवत नाहीत. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर रक्तदाब तपासणे आवश्यक आहे.

संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जास्त तेलकट, खारट आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे.

दररोज व्यायाम करा

हृदयाचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल आवश्यक आहे. किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा योगा केल्यास हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित व्यायामामुळे वजनही नियंत्रणात राहते.

तणावावर नियंत्रण ठेवा

सततचा मानसिक ताण हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ध्यान, योगा आणि आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवून तणाव कमी करता येतो. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ फिरायलाही जाऊ शकता.

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ८ तासांची गुणवत्तापूर्ण झोप हृदयासाठी फायदेशीर मानली जाते. अपुरी झोप रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

तंबाखू आणि मद्याचे सेवन रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

नियमित आरोग्य तपासणी करा

कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि हृदयाशी संबंधित तपासण्या वेळोवेळी करून घेतल्यास संभाव्य आजारांचे निदान लवकर होऊ शकते. जर तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर दर तीन महिन्यांनी हृदयाच्या आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे आणि वर्षातून किमान संपूर्ण आरोग्याची म्हणजे Full Body Check Up केला पाहिजे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • तुम्हाला छातीत दुखते किंवा जडपणा जाणवणे.
  • अचानक दम लागणे.
  • अचानक आणि अकारण घाम येणे.
  • श्रमाशिवाय सतत थकवा जाणवणे.
  • छातीत दुखणे जे डाव्या हाताकडे, मानेकडे किंवा जबड्याकडे पसरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: बदलत्या हवामानात वाढतो आजारांचा धोका; अशी घ्या योग्य काळजी

Web Title: Heart health tips for men over 40 prevent heart disease warning signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • health awareness
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

चहा पिण्याचा घ्या मनसोक्त आनंद! उपाशी पोटी चहा पिण्याआधी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, ॲसिडिटी- अपचनाचा त्रास होईल गायब
1

चहा पिण्याचा घ्या मनसोक्त आनंद! उपाशी पोटी चहा पिण्याआधी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, ॲसिडिटी- अपचनाचा त्रास होईल गायब

Sleepiness After Eating Rice: भात खाल्ल्यानंतर झोप का येते? जाणून घ्या यामागचं कारण
2

Sleepiness After Eating Rice: भात खाल्ल्यानंतर झोप का येते? जाणून घ्या यामागचं कारण

Health Tips: बदलत्या हवामानात वाढतो आजारांचा धोका; अशी घ्या योग्य काळजी
3

Health Tips: बदलत्या हवामानात वाढतो आजारांचा धोका; अशी घ्या योग्य काळजी

Diabetes: गूळ की साखर? कोणामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते? जाणून घ्या सत्य
4

Diabetes: गूळ की साखर? कोणामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते? जाणून घ्या सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.