माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा
सेंद्रिय खत कुठे तयार करावे?
यासाठी सर्वप्रथम आपल्या बागीच्यात एक अशी जागा निवडा जिथून पाण्याचा लगेच निचरा होऊ शकेल. हलकी सावलीची जागा सेंद्रिय खतासाठी उत्तम मानली जाते. तथापि, सूर्यप्रकाश आणि सावली दोन्हीत सेंद्रिय खत तयार केले जाऊ शकते. जिथे पावसाचे पाणी साचते अशी जागा टाळा, कारण जास्त आर्द्रतेमुळे कंपोस्ट सडू शकते आणि त्याला दुर्गंधी येऊ शकते.
हवेची काळजी घ्या
स्वयंपाकघरातील कचरा हा थेट जमिनीवर टाकण्याची चूक करु नका. सेंद्रिय खतासाठी सर्वात आधी सुकी पाने तळाशी ठेवा, मग लाकडांच्या काड्या आणि जो काही सुका कचरा असेल त्याचा ढिग तळाशी लावा. सेंद्रिय खतात वास येण्याच्या समस्येपासून वाचण्याचा मार्ग म्हणजे ग्रीन आणि ब्राउन साहित्याचे योग्य प्रमाण राखणे. ग्रीन कचऱ्यात भाज्यांची साले, चहाचा चोथा, गवत यांचा समावेश होतो. तर ब्राउन कचऱ्यात वाळलेली पाने, फांद्या, पुठ्ठा, कागद, वाळलेले वनस्पतीजन्य पदार्थ, लाकडाचे लहान तुकडे किंवा लाकडाचा भुसा यांचा समावेश होतो. उत्तम कंपोस्टसाठी, २ ते ३ भाग तपकिरी कचऱ्यामध्ये १ भाग हिरवा कचरा मिसळा. यामुळे खत फार कुजणार नाही आणि यातून दुर्गंध वास देखील येणार नाही.
अन्नाला गुंडाळून एकत्रित करा
माशांचा त्रास आणि खतातून येणारा दुर्गंध वास नको असेल तर भाज्यांची किंवा फळांची साले टाकण्याआधी त्यांना सुक्या पानांनी किंवा कार्डबोड अथवा ब्राउन सुकलेल्या साहित्याने गुंडाळा. यामुळे माशा येत नाहीत आणि वासही कमी होतो.
पावसाळ्यात खास काळजी घ्या
जर तुम्ही खुल्यावर सेंद्रिय खत ठेवले असेल तर पावसामुळे यात पाणी जाऊ शकते आणि खत खराब होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी सेंद्रिय खताला कोणत्या तरी झाकणाने किंवा कोणत्याही वस्तूने कव्हर करत पाण्यापासून याचा बचाव करा. या टिप्सना फाॅलो करुन तुम्ही घरीच ऑर्गेनिक सेंद्रिय खत तयार करु शकता.
खत कसे तयार करावे?






