Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

घरातील भाज्यांची साले, सुकी पाने आणि इतर ओला-सुका कचरा फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करू शकता. या सोप्या पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 08:15 PM
घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

Follow Us
Follow Us:
  • घरच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
  • ओला आणि सुका कचरा योग्य प्रमाणात मिसळा
  • महिनाभरात कुंड्यांसाठी तयार होईल उत्तम कंपोस्ट
भाज्या, फळांची साले, कांद्याच्या साली, सुकी पाने हा घरातील कचरा प्रत्येकजण डस्टबिनमध्ये फेकत असतं. पण तुम्हाला माहितीये का? या कचऱ्याचाही तुम्ही रितीने वापर करु शकता ज्यामुळे बाग सहाहरित करण्यास याचा मोठा फायदा होईल. पूर्वीपासून झाडांना खत मिळवून देण्यासाठी घरगुती कचऱ्याचा वापर केला जात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याचे परिणाम खूप चांगले दिसून येतात. तुम्हाला गार्डनिंगमध्ये आवड असेल आणि घरीच कुंडीत झाडे उगवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर खतासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरीच DIY सेंद्रिय खत कसे तयार करायचे याची एक सोपी ट्रिक आपण या लेखात जाणून घेणार आहोत. या ट्रिकचा वापर करुन ऑर्गेनिक पद्धतीने खत तयार केले जाऊ शकते.

Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा

सेंद्रिय खत कुठे तयार करावे?

यासाठी सर्वप्रथम आपल्या बागीच्यात एक अशी जागा निवडा जिथून पाण्याचा लगेच निचरा होऊ शकेल. हलकी सावलीची जागा सेंद्रिय खतासाठी उत्तम मानली जाते. तथापि, सूर्यप्रकाश आणि सावली दोन्हीत सेंद्रिय खत तयार केले जाऊ शकते. जिथे पावसाचे पाणी साचते अशी जागा टाळा, कारण जास्त आर्द्रतेमुळे कंपोस्ट सडू शकते आणि त्याला दुर्गंधी येऊ शकते.

हवेची काळजी घ्या

स्वयंपाकघरातील कचरा हा थेट जमिनीवर टाकण्याची चूक करु नका. सेंद्रिय खतासाठी सर्वात आधी सुकी पाने तळाशी ठेवा, मग लाकडांच्या काड्या आणि जो काही सुका कचरा असेल त्याचा ढिग तळाशी लावा. सेंद्रिय खतात वास येण्याच्या समस्येपासून वाचण्याचा मार्ग म्हणजे ग्रीन आणि ब्राउन साहित्याचे योग्य प्रमाण राखणे. ग्रीन कचऱ्यात भाज्यांची साले, चहाचा चोथा, गवत यांचा समावेश होतो. तर ब्राउन कचऱ्यात वाळलेली पाने, फांद्या, पुठ्ठा, कागद, वाळलेले वनस्पतीजन्य पदार्थ, लाकडाचे लहान तुकडे किंवा लाकडाचा भुसा यांचा समावेश होतो. उत्तम कंपोस्टसाठी, २ ते ३ भाग तपकिरी कचऱ्यामध्ये १ भाग हिरवा कचरा मिसळा. यामुळे खत फार कुजणार नाही आणि यातून दुर्गंध वास देखील येणार नाही.

अन्नाला गुंडाळून एकत्रित करा

माशांचा त्रास आणि खतातून येणारा दुर्गंध वास नको असेल तर भाज्यांची किंवा फळांची साले टाकण्याआधी त्यांना सुक्या पानांनी किंवा कार्डबोड अथवा ब्राउन सुकलेल्या साहित्याने गुंडाळा. यामुळे माशा येत नाहीत आणि वासही कमी होतो.

पावसाळ्यात खास काळजी घ्या

जर तुम्ही खुल्यावर सेंद्रिय खत ठेवले असेल तर पावसामुळे यात पाणी जाऊ शकते आणि खत खराब होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी सेंद्रिय खताला कोणत्या तरी झाकणाने किंवा कोणत्याही वस्तूने कव्हर करत पाण्यापासून याचा बचाव करा. या टिप्सना फाॅलो करुन तुम्ही घरीच ऑर्गेनिक सेंद्रिय खत तयार करु शकता.

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

खत कसे तयार करावे?

  • यासाठी एक बादली किंवा कंपोस्ट बिन घ्या आणि हवा जाण्यासाठी त्याची खाली लहान छिद्रे पाडा.
  • याच्या तळाशी ब्राउन म्हणजेच सर्व सुकलेला कचरा टाका. याची एक लेअर बसवा.
  • यानंतर यावर ओला कचऱ्याचा थर लावा. मासांहार पदार्थांचा यात समावेश नसावा.
  • कचऱ्याचा थर दिल्यानंतर दरवेळी थोडी माती यावर टाका.
  • जिवाणूंची वाढ होण्यासाठी हलके पाणी यावर शिंपडा आणि भांड्याला हवेशीर ठिकाणी ठेवा.
  • महिनाभराने कचरा कुजेल आणि काळ्या रंगाचे सेंद्रिय खत तयार होईल.

Web Title: Home kitchen waste organic compost fertilizer gardening tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Garbage Issue
  • gardening tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
1

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Mumbai News: मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! रिसोर्स रिकव्हरी केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये
2

Mumbai News: मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! रिसोर्स रिकव्हरी केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत
3

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
4

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.