Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Control Tips: घरात झुरळांचा सुळसुळाट? करा कायमचा बंदोबस्त, फॉलो करा ‘हे’ प्रभावी घरगुती उपाय

Cockroach Control Home remedies: जर तुमच्याही घरात झुरळांचा सुळसुळाट वाढला आहे तर हे प्रभावी घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 06:45 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:
  • घरात झुरळांचा सुळसुळाट?
  • फॉलो करा हे प्रभावी घरगुती उपाय
  • झुरळांमुळे होतात आरोग्यावर परिणाम
उन्हाळ्याच्या दिवसांत घरात झुरळांची संख्या वाढणे ही अनेक घरांतील सामान्य समस्या आहे. स्वयंपाकघरातील ओलावा, अन्नाचे तुकडे आणि अस्वच्छता यामुळे झुरळांना वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. झुरळे केवळ घाण पसरवत नाहीत, तर अनेक गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरतात. त्यामुळे वेळेवर त्यांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापरकरुन तुम्ही झुरळांचा कायमचा बंदोबस्त करु शकता, जाणून घ्या.

Weight Loss Tips: व्यायाम करुनही वजन कमी होत नाहीये? मग ‘या’ सामान्य चुका टाळा

झुरळांमुळे होतात आरोग्यावर परिणाम

झुरळे गटारे, कचरा आणि घाणेरड्या जागांमध्ये फिरत असल्यामुळे त्यांच्याद्वारे जंतू आणि जीवाणू घरात पसरतात. ते अन्न व भांड्यांवर चढल्याने पोटदुखी, अतिसार, अन्नातून विषबाधा, ॲलर्जी आणि दम्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.

बोरिक ॲसिडचा प्रभावी उपाय

झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी बोरिक ॲसिड हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. बोरिक ॲसिडमध्ये पीठ आणि साखर मिसळून छोटे गोळे तयार करावेत. हे गोळे स्वयंपाकघरातील कोपरे, सिंकखाली किंवा स्टोव्हच्या मागे ठेवावेत. साखरेमुळे झुरळे आकर्षित होतात आणि बोरिक ॲसिडमुळे ती नष्ट होतात.

कडुलिंब आणि पुदिन्याचा वापर

झुरळांना तीव्र वास आवडत नाही. त्यामुळे कडुलिंबाचे तेल, पुदिन्याचे तेल किंवा लवंग यांचा वापर फायदेशीर ठरतो. फरशी पुसताना पाण्यात काही थेंब कडुलिंब किंवा पुदिन्याचे तेल टाकल्यास झुरळे दूर राहतात. तसेच, कापसावर पुदिन्याचे तेल लावून स्वयंपाकघरात ठेवल्यासही चांगला परिणाम दिसतो.

स्वच्छता राखणे अत्यावश्यक

घरात घाण साचू न देणे हे झुरळ नियंत्रणाचे सर्वात महत्त्वाचे स्टेप आहे. सिंक कोरडे ठेवणे, अन्न झाकून ठेवणे, कचरा नियमित साफ करणे आणि भिंतींमधील किंवा पाईपांभोवतीच्या भेगा बंद करणे आवश्यक आहे. घर स्वच्छ राहिल्यास झुरळे टिकून राहू शकत नाहीत.

घरगुती उपाय आणि नियमित स्वच्छता यांच्या मदतीने झुरळांवर सहज नियंत्रण मिळवता येते. मात्र समस्या जास्त वाढल्यास प्रोफेशनल कीटक नियंत्रण सेवा घेणे अधिक प्रभावी ठरते. स्वच्छ आणि निरोगी घरासाठी झुरळांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही.

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश

Web Title: Home remedies to get rid of cockroaches natural pest control tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • cleaning tips
  • Cockroaches
  • home remedies
  • kitchen tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
2

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
3

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा
4

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.