फोटो सौजन्य - Social Media
मुंबईच्या खार परिसरात घडलेली ही घटना आहे. मुळात, खार तसे गर्दळीचे शहर! येथील वस्ती कधी झोपत नाही पण त्या रात्री फार काळोखी शांतता पसरली होती. सुदेश कामावरून १२ च्या सुमारास घरी आला. संपूर्ण परिसर अगदी झोपून गेले होते. रोज इतकी शांतात नसते. आज चंद्र देव जाणे कोणत्या बाजूने उगवला? असा प्रश्न सुदेशला पडतो. नकळत सुदेशची नजर आकाशात चंद्राचा शोध घेते पण वर पाहून त्याला कळते”अरेच्चा…आज तर अमावस्या!”
त्याच्या घरी जाण्याचा रस्ता तसा गल्ली गोळ्यातून आहे. वाटेत त्याला एक महिला दिसते. सफेद साडीत शांतपणे एकटक पाहत बसलेली असते. सुदेशने त्या महिलेला त्या क्षेत्रात कधीच पहिले नव्हते. सुदेश दुर्लक्ष करून घराकडे निघून जातो. घरी जेवतो, फ्रेश होतो आणि झोपून जातो. रात्री दोनच्या सुमारास कुणीतरी त्यांच्या घराची बेल वाजवतो. सुदेश आणि त्याच्या मुलाला जाग येते. साहजिक आहे इतक्या रात्री कोण येणार आहे घरी? असा प्रश्न त्यांच्या मनात पडत असतो. सुदेश दारावर असणाऱ्या पीपहोलमधून बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो, इतक्यात दारावर जोरात कुणीतरी धडक देण्याचा आवाज येतो.
सुदेश आणि त्याचा मुलगा सार्थक, घाबरून जातात. घरात अनेकांना जाग येते. तेव्हा सुदेश दाराच्या कीहोलमधून झाकून पाहण्याऐवजी तिथे मोबाईलचा कॅमेरा लावतो. विश्वास बसणार नाही पण त्या कॅमेरात एका महिलेचे चित्र कैद होते. ही तीच महिला असते, जिला सुदेशने घरी येताना पाहिले असते. मोकळे केस, नैराश्य असणाऱ्या अवस्थेत एकटक पाहत ती महिला समोरच्या जिन्यावर बसलेली दिसते. सुदेश लगेच मोबाईलचा कॅमेरा बंद करतो आणि त्याच्या मुलाला झोपून जाण्यास सांगतो.
घरामध्ये सगळीजण जागी असतात. सुदेश कुणालाच काही सांगत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडत. सलग तीन दिवसांसाठी हा खेळ घडत असतो.