फोटो सौजन्य - Social Media
कोकणात अशा अनेक भयाण गोष्टी घडत असतात. कोकणात एकटं फिरणंही अनेक अनुभव देऊन जातील. अशीच काही घटना रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात घडली. दुखंडे यांच्या ६ मुली गणपतीच्या दिवसात काही खरेदीसाठी राजापूर तालुक्याच्या ठिकाणी गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास ते गावाकडे परतल्या. त्यांचे घर तसे गावापासून जरा बाहेर! तालुक्याकडून येणारी ST त्यांना गावातील ST स्टॅन्डवर सोडते. पण तेथून त्यांचे घर पायवाटेने जर लांबच पडते. या बहिणी त्यांच्या घराकडे वाटचाल करतात.
वाटेत त्यांना व्हाळ लागते. व्हाळ म्हणजे नदीकडे वाहत जाणारे छोटे पाण्याचे स्रोत! पुलावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला गेल्यावर त्यांना माहिती पडते की त्यांच्यातील एक बहीण कमी आहे. ते लोकं येथे तिथे, मागे पुढे, अगदी सगळीकडे शोधाशोध करतात पण त्यांना कुठेच सापडत नाही. शेवटी त्या उर्वरित पाच बहिणी गावातील भगताकडे जातात. भगताला सगळी गोष्ट समजावून सांगतात. भगत त्या ठिकाणी येऊन स्वतः शोधाशोध करतो. व्हाळाच्या शेजारी असणाऱ्या वडाच्या झाडावर ती मुलगी बसलेली असते. तिला खाली उतरवण्यात येते. तिला घराकडे आणून मागच्या दारात बांधले जाते.
भगत फार उपाययोजना करतो पण तिच्या अंगात शिरणार वारं काय बाहेर सुटेना! शेवटी, भगत कौल लावून तिच्या अंगात नक्की आहे तरी कोण? याचा शोध लावतो. भगत म्हणतो, “हिच्या अंगात कुणी साधंसुधं भूत नसून एका आईची माया आहे. अगदी लहान वयातच तिचा बाळ गेला. ती बाई वेडी झाली. तिने आयुष्याला कंटाळून विहिरीत उडी मारली ती वाचली. स्वतःला पेटवून घेतले तरी वाचली. शेवटी त्या माउलीने दगडावर डोकं आपटून जीव सोडला. असा वाईट आणि दुर्दैवी मृत्यू तिच्या नशीबात आलेलं आहे. तिला मान द्यावाच लागेल.” तेव्हा भगत त्या मुलीच्या रूपात असणाऱ्या त्या माऊलीची ओटी भरतात आणि तिच्या अंगातून ते वारं सुटतं.
भगत तेव्हा हे सगळं प्रकरण घडल्या मागचे कारण सांगतात की, “त्यांचे असे म्हणणे असते की त्या मुलीचे पाय एका लिंबुवर पडते. ते नजरेचे लिंबू असते. त्यामुळे तिला हा त्रास होतो.” अशा अनेक घटना कोकणात तसेच जगभरात घडत असतात. काहींना त्या खऱ्या वाटतात तर काही विश्वास नाही ठेवत. पण सत्य हेच की अशा घटना घडतात आणि अनुभव आल्याशिवाय विश्वास बसत नाही.