फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दुबईमध्ये सुरु होणाऱ्या आशिया कपची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे तर दुसरीकडे कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये करत असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. यामध्ये आतंरराष्ट्रिय संघामधील अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. वेस्टइंडिजच्या संघाचे खेळाडू हे त्याच्या ताकदीच्या खेळामुळे त्याचबरोबर त्याच्या रेकाॅर्डमुळे ओळखले जातात. वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड देखील या लीगमध्ये सामील झाला आहे आणि तो त्याच्या वयाच्या 38 व्या वर्षी कमालीची कामगिरी करत आहे.
वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२५ मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्सचा भाग असलेल्या पोलार्डने गयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले. पोलार्डने १८ चेंडूत नाबाद ५४ धावा ६ सप्टेंबर रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर केल्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ३८ वर्षीय पोलार्डने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
सीपीएलमधील हे त्याचे सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याचबरोबर, एकूण यादीतील हे संयुक्तपणे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. एविन लुईस आणि डेव्हिड मिलर यांनीही १७-१७ चेंडूत अर्धशतक झळकावले आहेत. सीपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर आहे (१४ चेंडूत). त्याच्या पाठोपाठ जेपी ड्युमिनी (१५ चेंडूत) आहे.
Kieron Pollard brings up his fifty in scintillating style! 🔥#CPL25 #CricketPlayedLouder#BiggestPartyInSport #GAWvTKR #RepublicBank pic.twitter.com/zGBFFKkrRF
— CPL T20 (@CPL) September 7, 2025
पोलार्डने ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात रोमारियो शेफर्डला फाडून टाकले. त्याने २० व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग षटकार मारले आणि नंतर पाचव्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला. पोलार्डने सीपीएलच्या चालू हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. पोलार्डने १ सप्टेंबर रोजी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध २९ चेंडूत ६५ धावा आणि २३ ऑगस्ट रोजी सेंट लुसिया किंग्जविरुद्ध २९ चेंडूत ६५ धावा केल्या.
मात्र, पोलार्डची धमाकेदार खेळी व्यर्थ गेली. १६७/५ धावा करूनही ट्रिनबागो नाईट रायडर्सना तीन विकेटनी पराभव पत्करावा लागला. गयाना अमेझॉन वॉरियर्सने एक चेंडू शिल्लक असताना विजयाचा झेंडा फडकावला. त्यांच्याकडून शाई होपने सर्वाधिक धावा केल्या. होपने ४६ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि तेवढेच षटकार निघाले. शिमरॉन हेटमायरने ३० चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह ४९ धावांची खेळी केली. ड्वेन प्रिटोरियसने १४ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या, ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. गुडाकेश मोतीने विजयी धावा केल्या. तो ६ चेंडूत पाच धावा करून नाबाद परतला.