फोटो सौजन्य - Social Media
मुंबईत सकाळ असो वा रात्र गजबज असतेच. पण काही जागा अशा आहेत, जिथे माणसांची नाही तर काही सावल्यांची गजबज असते. काही सावल्यांचा खेळ सुरु असतो. अशीच एक घटना घडली आहे विक्रोळी पश्चिमधील सूर्यानगरमध्ये! जगन नावाचा मुलगा रात्री उशिरा कामावरून घरी परतत होता. विक्रोळी स्थानकावर उतरला आणि धीम्या पावलांनी घरी मार्गस्थ झाला. ती रात्र फार अंधार जाणवत होता. शांतता जाणवत होती. जगनशिवाय तिथे कुणीही आसपास दिसत नव्हता.
जगन तसा धीट मुलगा! याच वेळेत तो घरी परतत असे. राधाबाईच्या चाळीत त्याचे घर होते. गल्लीगल्लीतुन चालत तो घरी जात होता. अचानक त्याला मागून छम छम असा धीम्या पावलांची पैजनी आवाज आला. जगन काही वेळासाठी स्तब्ध झाला. पण त्याने मागे वळून पाहिले नाही. जसजसा तो पुढे जात होता, हा आवाज वाढू लागला. सुंदर असा आवाज कर्कश होऊ लागला. जगन कानावर हात ठेऊन, घामाघूम अवस्थेत चालत होता. मागून त्याला महिलेचा आवाज येत होता. अतिशय रागीट असा तो आवाज त्याचेच नाव घेऊन त्याला हाक मारत होता. जगन तरीही मागे वळून पाहत नव्हता. शेवटी जगन एका मैदानात येऊन थांबला. त्याच्या अंगातून थेंबांचा वर्षाव होत होता. त्याने मागे वळून पाहिले.
मागे, एक महिला भाजलेल्या अवस्थेत होती. तिचे पाय उलटे होते. शांतपणे ती एकटक पाहत होती. पण ती त्या मैदानात येऊ शकली नाही कारण जगन ज्या ठिकाणी होता, तेथे साईनाथाचे मंदिर होते. जगनला कळून चुकले की आता आपण सुरक्षित आहोत. मैदानाच्या अगदी शेजारीच त्याचे घर होते. जगन त्याच्या घरी मार्गस्थ झाला. मागून त्या महिलेच्या हसण्याचा कर्कश आवाज त्याच्या कानावर येत होता. जगन घरात पोहचला, आईला सर्वकाही सांगितलं. तेव्हा आईने त्याला एक कथा सांगितली. आईने सांगितले की,”ती प्रतिभा आहे. तुझ्या जन्माच्या आधी, ती समोरच्या चाळीत राहायची. तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. ही तीच!” आईने जगनची मीठ मोहरीने चाक काढली. तेव्हापासून जगन रात्रीच्या वेळी काम करणे टाळत असत.